छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि त्यांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी, त्यांच्या खऱ्या इतिहासाला डावलण्याचे काम काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केला. कराड तालुक्यातील काँग्रेस (Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि. १५ मार्च रोजी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) बोलत होते.
( हेही वाचा : Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !)
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, काँग्रेस पक्ष राजकीय स्वार्थासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करतो आणि दुसरीकडे आपल्या विरोधकांना जातीयवादी म्हणतो. त्यांचा हा खोटारडेपणा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. अशा प्रकारे जातींमध्ये भांडणे लावत हा आणि त्याचे समविचारी पक्ष त्यांची राजकीय पोळी भाजून घेतात, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांनी केली.
तसेच महाराष्ट्राचीच (Maharashtra) नाहीतर देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) या काँग्रेस (Congress) पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनीच सर्वाधिक बदनामी केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या कार्याकडे त्यांनी मुद्दाम दुर्लक्ष केले. त्यांचा इतिहास, पाऊलखुणा, गडकिल्ले या साऱ्यांकडे या पक्षाने मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला महाराजांची उपेक्षा करायची आणि दुसरीकडे त्यांची बदनामी करत रहायचे हे एक मोठे षडयंत्र आहे. आमचा इतिहास, अस्मिता बदलण्याचा, पुसण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेने याबाबत वेळीच सावध होत या अशा विचारांना थारा देऊ नये, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी जनतेला केले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community