Fire : मध्य प्रदेशातील रुग्णालयात भीषण आग; १९० हून अधिक रुग्णांची सुटका

37
Fire : मध्य प्रदेशातील रुग्णालयात भीषण आग; १९० हून अधिक रुग्णांची सुटका

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील एका सरकारी रुग्णालयात रविवारी (दि. १६) पहाटे आग (Fire) लागल्याची भीषण घटना समोर आली. लेबर रूमच्या गायनोकॉलजी आयसीयूमध्ये ही आग लागली, एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला आणि त्यानंतर आग (Fire) लागली. या आगीच्या घटनेनंतर १९० हून अधिक रुग्णांना रुग्णालयातून वाचवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर शहरातील कमला राजा रुग्णालयात रविवारी (दि. १६) पहाटे १ च्या सुमारास स्त्रीरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एअर कंडिशनरमध्ये आग (Fire) लागली. आगीनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षक आणि वॉर्ड बॉय यांनी खिडक्यांच्या काचा फोडून तात्काळ आयसीयूमध्ये भरती असलेल्या सर्व रुग्णांना बाहेर काढले आणि त्यांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९० हून अधिक रुग्णांना ज्यामध्ये १३ आयसीयूमधील रुग्णांचा देखील समावेश होता, या आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

(हेही वाचा – Pune : एसटीच्या ताफ्यातील आणखी ७२ बस होणार स्क्रॅप !)

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रुचिका चौहान, एसडीएम विनोद सिंह, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सक्सेना आणि इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लेबर युनिट आणि लगतच्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांना रुग्णवाहिकांच्या मदतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पथकाने तातडीने काम केलं आणि रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. (Fire)

प्राथमिक तपासात ही आग (Fire) शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आलं आहे. रुग्णालय प्रशासन आता सुरक्षा व्यवस्था कुठे कमी पडली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या रुग्णालयातील परिस्थिती सामान्य आहे, परंतु या घटनेमुळे रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.