सामायिक लोकशाही मूल्ये, दोन्ही देशांच्या रहिवाश्यांमधील परस्पर संबंध व आर्थिक परस्परावलबित्व यांच्या मजबूत आधारावर भारत व न्यूझीलंड (India-New Zealand) यांच्यातील दीर्घकालीन भागीदारी टिकून राहिली आहे. व्यापार व गुंतवणूक यांचा समावेश असलेल्या द्विपक्षीय संबंधांना पोषक वातावरण देण्यासाठी दोन्ही देशांनी सतत प्रयत्न केले आहेत.
न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या 16 ते 20 मार्च दरम्यान होणाऱ्या भारत भेटीच्या निमित्ताने व दोन्ही देशातील बळकट आर्थिक सहकार्य भावनेत, एका सर्वसमावेशक व दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल अशा भारत-न्यूझीलंड (India-New Zealand) मुक्त व्यापार करार वाटाघाटींची सुरुवात झाली असल्याचे दोन्ही देश सहर्ष घोषित करत आहेत.
(हेही वाचा – भाजपा नेत्याचा Sanjay Raut यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, मेंदूचे…)
भारताचे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल व न्यूझीलंडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री टॉड मॅक क्ले यांची 16 मार्च रोजी झालेली बैठक म्हणजे या दृष्टीने घेतलेले महत्त्वाचे पाऊल असून त्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व व्यापारी संबंधांची मजबूत पायाभरणी करणाऱ्या एका मोठ्या भागीदारीची सुरुवात होणार आहे. (India-New Zealand)
भारत-न्यूझीलंड (India-New Zealand) यांच्यातील पुरवठा साखळ्यांची क्षमता वाढ व दोन्ही बाजारपेठांमधील खुलेपणा वाढवण्याच्या दृष्टीने समतोल परिणाम साधणे हे या मुक्त व्यापार करार वाटाघाटींचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या महत्त्वाच्या टप्प्यातून मजबूत आर्थिक भागीदारी व समृद्धीसाठी बलवर्धन करण्याचा सामायिक दृष्टीकोन प्रतिबिंबित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community