Groundwater : धोक्याची घंटा!

७ जिल्ह्यांतील भूजल पिण्यास अयोग्य, रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम !

118
Groundwater : धोक्याची घंटा!
  • सायली डिंगरे-लुकतुके

शेतीमध्ये प्रचंड प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचे आणि औषधांचे गंभीर दुष्परिणाम समोर आले आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापराने भूजल (Groundwater) प्रदूषित होऊन जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेल्या २०२४ च्या वार्षिक ‘भूजल गुणवत्ता अहवाला’तून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय भूजल मंडळाने देशातील ४४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांमध्ये भूजल पातळीत नायट्रेटचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यांतील भूजल (Groundwater) पिण्यायोग्य राहिलेले नाही, हे यातून समोर आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात तारांकित प्रश्नाअंतर्गत या गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली.

(हेही वाचा – Congress ने छत्रपतींच्या बदनामीचे काम केले; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा हल्लाबोल)

जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय मानक ब्युरो यांनी पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा ४५ मिलीग्राम प्रति लिटर इतकी निश्चित केली आहे. या सात जिल्ह्यांमध्ये घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये मर्यादेपेक्षा अधिक म्हणजेच ३५.७४ टक्के नायट्रेट या विषारी रसायनाचे प्रमाण असल्याचे समोर आले आहे. एकट्या नांदेड जिल्ह्याचा विचार केला, तर वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने नांदेड जिल्ह्यातील भूजल (Groundwater) नमुन्यांची पावसाळ्यानंतर तपासणी केली असता ३ हजार ८७७ पाण्याच्या नमुन्यांपैकी २ हजार २१० पाण्याचे नमुने सदोष आढळून आले आहेत. केवळ १ हजार ७६७ जलस्रोत पिण्यायोग्य असल्याचे या सर्वेतून निदर्शनास आले. भूभागातील पाणी दूषित आणि आरोग्यास घातक झाल्यामुळे ब्लुबेरी सिंड्रोमसारखे प्राणघातक आजार, तसेच साथीचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

(हेही वाचा – Beed Crime : गावोगावी वाल्या, खोक्या; गुन्हेगारीच्या छायेत गाव-शहरांचा कारभार)

सरकारकडून नळ पाणीपुरवठा योजनांचा उतारा

रासायनिक खतांमुळे ही भीषण समस्या निर्माण झाल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, “नायट्रेटयुक्त खते, रासायनिक खते, तसेच औषधांचा पिकांवर अतिवापर होत असल्याने पाण्याच्या स्रोतामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे लोकांना गुणवत्तापूर्ण पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं, यासाठी ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरवर्षी पाण्याची तपासणी केली जाते. सलग २ वेळा रसायनिक तपासणीत पाणी दूषित आढळल्यास त्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताभोवती ‘पाणी पिण्यास अयोग्य’ असा फलक लावण्यात येतो. जे जलस्त्रोत बाधित आढळले आहेत, त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. (Groundwater)

(हेही वाचा – Pakistan मधील महाविद्यालयात भारतीय गाण्यावर नाचण्यास बंदी; नेमकं कारण काय?)

कोणत्या जिल्ह्यात किती आहे नायट्रेटबाधित पाणी ?
अ.क्र. जिल्हा तपासणी केलेले एकूण नमुने नायट्रेट बाधित पाण्याचे नमुने
वर्धा १३३० ४९
बुलढाणा ४१०४ १६५
अमरावती २३६७ १२०
नांदेड ३८७७ २१९०
बीड ५२१९ ०१
जळगाव २५०७ २१८
यवतमाळ १००१० ६७५

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.