Navi Mumbai International Airport ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; गौतम अदानी यांनी घेतला कामाचा आढावा

348
 Navi Mumbai International Airport ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; गौतम अदानी यांनी घेतला कामाचा आढावा
 Navi Mumbai International Airport ‘या’ महिन्यापासून सुरू होणार; गौतम अदानी यांनी घेतला कामाचा आढावा

Navi Mumbai International Airport : मागील ७० वर्षांत लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली, मात्र मुंबईत एकमेव विमानतळ (Airport) असल्याने उड्डाणांवर ताण वाढत होता. मात्र आता नवी मुंबईतील विमानतळामुळे हा ताण हलका होण्यास मदत होणार आहे.  दरम्यान बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळ एप्रिलपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असे संकेत यापूर्वी मिळालेले असतानाच या विमानतळासाठी आता जूनचा मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. तसेच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी रविवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला व प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. जून २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन प्रस्तावित असल्याचे अदानी समूहातर्फे यानंतर सांगण्यात आले. (Navi Mumbai International Airport)

(हेही वाचा – Tree Cutting : झाडांचे मारेकरी कोण?)

तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) येत्या मे महिन्यातील 17 एप्रिल रोजी त्याचे उद्घाटन होणार होते. पण विमानतळासाठी आता जूनचा मुहूर्त मिळाल्याचे दिसत आहे. सुरुवातीला विमानतळाचा टी-१ टर्मिनल (Navi Mumbai International Airport T-1 Terminal) आणि एक धावपट्टी कार्यान्वित केली जाईल, तर हळूहळू इतर सुविधादेखील सुरू केल्या जातील.

‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाला गती देणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. २०२५च्या जूनपर्यंत तो पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही त्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. हा विमानतळ नवी मुंबई व मुंबई शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल,’ असा विश्वासही अदानी यांनी या पाहणीदरम्यान व्यक्त केला. यावेळी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासोबत डॉ. प्रिती अदानी, जीत अदानी, दिवा अदानी, तसेच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल (Arun Bansal) आणि एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा व विविध संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

(हेही वाचा – Groundwater : धोक्याची घंटा!)

मुंबई विमानतळाचे T1 टर्मिनल बंद होणार

मुंबई विमानतळावरील T1 टर्मिनल पुनर्बांधणीसाठी ऑक्टोबर 2025 पासून बंद राहणार आहे आणि 2029 मध्ये नव्या स्वरूपात सुरू होईल. यामुळे, T1 वरून चालणाऱ्या सुमारे 1.5 कोटी प्रवाशांपैकी 1 कोटी प्रवाशांचे उड्डाण नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केले जाईल. उर्वरित 50 लाख प्रवाशांचे नियोजन मुंबईच्या सहार भागातील T2 टर्मिनलमध्ये करण्यात आले आहे.

विमानतळाची प्रमुख वैशिष्ट्ये

■ अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ

■ वेगवान संपर्कासाठी मोठे रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांशी जोडणी

■ उच्च दर्जाच्या आधुनिक प्रवासी आणि मालवाहतूक सुविधा

■ पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत सुविधा

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.