Indian Navy च्या ताफ्यात दुसरी स्फोटकेवाहिका नौका दाखल; काय आहेत वैशिष्ट्ये?

स्फोटकांची ने-आण करण्यासाठीच्या या युद्धनौकेला स्फोटकांच्या इंग्रजीतील आद्यक्षरानुसार 'एससीटीसीएम' (अॅम्युनिशन कम टापेंडो कम मिसाइल्स) असे संबोधले जाते.

58
Indian Navy च्या ताफ्यात दुसरी स्फोटकेवाहिका नौका दाखल; काय आहेत वैशिष्ट्ये?

नौदलाच्या ताफ्यात दोन महिन्यांत दुसरी स्फोटकेवाहक नौका दाखल झाली आहे. वसईजवळील नागला बंदरात ठाण्याच्या कंपनीने नौदलासाठी ही नववी युद्धनौका नौदलाच्या सुपूर्द केली आहे. स्फोटकांची ने-आण करण्यासाठीच्या या युद्धनौकेला स्फोटकांच्या इंग्रजीतील आद्यक्षरानुसार ‘एससीटीसीएम’ (अॅम्युनिशन कम टापेंडो कम मिसाइल्स) असे संबोधले जाते. त्यानुसार स्फोटके, पाणतीर व क्षेपणास्त्र वाहून नेण्याची या नौकेची क्षमता आहे. या नौकांना लैंडिंग शिप अम्युनेशन (एलएसएएम) असेदेखील म्हटले जाते. (Indian Navy)

(हेही वाचा – ७१ वर्षांनी आला अभूतपूर्व योग; Nashik Kumbh Mela २८ महिने चालणार)

युद्धनौका व पाणबुड्या समुद्रात मोहिमेवर असताना शस्त्रसामग्रीसह असतात. त्यावेळी ठराविक मर्यादहून अधिक सामग्री वाहून नेता येत नाही. अशावेळी युद्धजन्य स्थितीत खोल समुद्रात युद्धनौकांना क्षेपणास्त्र किंवा पाणतीरांसह अन्य सामग्रीची गरज भासल्यास किनाऱ्यावर येणेदेखील शक्य नसते. या स्थितीत स्फोटकेवाहक नौका (समुद्रावरील तरंगता फलाट) उपयुक्त पडतो. त्यातून अशी शस्त्रसामग्री वाहून नेता येऊ शकते. नागला बंदर येथे तयार होऊन नौदलाकडे सुपूर्द केलेली युद्धनौका याच श्रेणीतील आहे.  (Indian Navy)

आठवी नौका जानेवारीत दाखल करून घेण्यात आली व दोनच महिन्यात अशी नववी युद्धनौका ताफ्यात आली आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडचा विचार केल्यास, कमांड स्फोटके डेपो करंज येथील ‘आयएनएस तुनीर आहे. तर मुख्य तळ कुलाब्यात आहे. अशावेळी करंजवरून ही स्फोटके मुख्य तळावर उभ्या असलेल्या युद्धनौकेत आणण्यासाठी या युद्धनौकेचा चांगला उपयोग होणार आहे. सुरक्षितरित्या ही स्फोटके याद्वारे आणता येणार आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सूर्यादीप्ता प्रोजेक्ट्स या कंपनीला बार्ज प्रकारातील अशा एकूण ११ युद्धनौका तयार करण्याचे कंत्राट नौदलाने दिले आहे.  (Indian Navy)

(हेही वाचा – Groundwater : धोक्याची घंटा!)

डेब्रिज उचण्यासाठी चार नौका

समुद्रातील विविध प्रकारचे डेब्रिज, युद्धनौका किंवा जहाजांचा मलबा आदी उचलण्यासाठी नौदल विशेष नौका तयार करीत आहे. अशा चार ‘सलेज बार्ज’ प्रकारच्या नौका तयार करण्याचे कंत्राटही नौदलाने याच कंपनीला दिले आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे. (Indian Navy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.