Matunga Robotics कार पार्किंगला विरोध; पण येथील अनधिकृत वाहनांवरील कारवाईकडेही दुर्लक्ष

माटुंगा भागातील अरुंद रस्त्यामुळे जुन्या इमारतीतील रहिवाशांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांसह याठिकाणी येणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते.

168

माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत रोबोटीक कारपार्किंग (Matunga Robotics) बनवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून सध्या या कारपार्किंगला विरोध होत असल्याने महापालिकेने सध्या तरी याच्या कामाबाबत कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. एका बाजुला येथील रोबोटिक कारपार्किंगला विरोध असतानाच येथील लखमशी नपू मार्गावरच मोठ्याप्रमाणात वाहने उभी केली जात आहे. रस्त्यावर तीन मार्गिंकांवर वाहने उभी केली आहे. परंतु या भागांत कारपार्किंगची गरज असतानाही याला काही मंडळी विरोध करत आहेत.  पण याबाबत नरमाईची भूमिका घेणारे महापालिका प्रशासन येथील अनधिकृत उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली जात आहे.

park

माटुंगा भागातील अरुंद रस्त्यामुळे जुन्या इमारतीतील रहिवाशांना वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहे. त्यामुळे रहिवाशांसह याठिकाणी येणाऱ्या लोकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे माटुंगा रेल्वे स्थानकाशेजारी तब्बल ४८० वाहन क्षमतेचे रोबोटीक पार्किगची (Matunga Robotics) सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्किंगच्या बांधकामासाठी सर्वप्रकारच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात वाहनतळाचे काम सुरु होणार तोच आता हे बांधकाम होवू नये यासाठी विरोध होत आहे. त्यामुळे येथील रस्त्यांची रचना आणि तेथील वाहने उभी करण्यात येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे याठिकाणी माटुंगा येथील वाहनतळाची नितांत गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, आता महापालिका प्रशासनाने विरोधाला न जुमानता बांधकाम करणे आवश्यक असतानाच याबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा Shivaji University च्या नामविस्तारासाठी कोल्हापुरात १० हजार हिंदू उतरले रस्त्यावर)

माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकाच्या समोर हे वाहनतळ उभारले जाणार असून येथील लाल बहादूर शास्त्री मंडईसह या भागांत खरेदीला येणारी मंडळील येथील लखमशी नपू मार्गावरील तीन मार्गिकांवर वाहने उभी करून हा मार्गच अडवून ठेवला जातो. या रस्त्यावर वाहनेच उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी केवळ एकच मार्गिका शिल्लक असते. परंतु बऱ्याच वेळा खरेदीला येणारी मंडळी वाहने मधेच थांबवून उतरुन जातात. त्यामुळे एकच मार्गिक वाहतुकीसाठी असल्याने जर एखादे वाहन जरी याठिकाणी थांबले तरी या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे या रस्त्यावर व परिसरात अनधिकृत वाहने उभी केली जात असल्याने कार पार्किंग आवश्यक आहे. त्यामुळे जर महापालिकेने रोबोटिक कारपार्किंग (Matunga Robotics) बनवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याच्या कामाला सुरुवात तरी करावी अन्यथा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने सर्व अनधिकृत वाहनांवर कारवाई  करून एकाही वाहनाला याठिकाणी उभे करण्यास परवानगी दिली जावू नये. महापालिकेने अशा रोबोटिक कारपार्किंगबाबत (Matunga Robotics) काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, परंतु तोपर्यंत  या रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी घालावी अशाप्रकारची मागणी स्थानिक रहिवाशांकडूनच होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.