Water Cut : पूर्व उपनगराच्या टोकाला पाणी समस्या, मंगळवारी मिळणार नाही पाणी…

263
Water Cut : पूर्व उपनगराच्या टोकाला पाणी समस्या, मंगळवारी मिळणार नाही पाणी...
Water Cut : पूर्व उपनगराच्या टोकाला पाणी समस्या, मंगळवारी मिळणार नाही पाणी...
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत सूक्ष्म बोगद्याचे काम सुरू असताना सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी मुलुंड पूर्व (Mulund East) येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस हरी ओम् नगर व म्हाडा कॉलनी मध्ये असलेल्या नाल्याच्या तळाला हानी पोहोचली. त्यामुळे जलवाहिनीस मोठ्या प्रमाणावर गळती आढळून आली. सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर (Ghatkopar) यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. (Water Cut)

जलवाहिनी दुरुस्ती काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १२ ते १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे खालील नमूद भागात १८ मार्च २०२५ रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. (Water Cut)

(हेही वाचा – वाढत्या नागरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटते; BMC सांगणार यावरील उपाय)

संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे. (Water Cut)

पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर

टी वॉर्ड:

  • मुलुंड पूर्व – पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्वेकडील भाग, म्हाडा वसाहत , हरी ओम् नगर
  • मुलुंड पूर्व – पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडील भाग ते मुलुंड स्टेशन पर्यंतचा परिसर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.