अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी युक्रेन युद्ध (Ukraine War) संपवण्यासाठी चर्चा करतील. अमेरिकेने रशियाला ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे. ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले की, आम्हाला ते युद्ध संपवता येते का ते पहायचे आहे. कदाचित आम्ही करू शकतो, कदाचित आम्ही करू शकत नाही, पण मला वाटते की मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलण्याची आपल्याला चांगली संधी आहे. (Ukraine War)
हेही वाचा-Matunga Robotics कार पार्किंगला विरोध; पण येथील अनधिकृत वाहनांवरील कारवाईकडेही दुर्लक्ष
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ३० दिवसांच्या युद्धबंदी प्रस्तावाला सहमती दर्शवली. रशियानेही तत्वतः सहमती दर्शवली आहे, परंतु कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही अटी पूर्ण कराव्या लागतील असे अध्यक्ष पुतिन म्हणतात. म्प यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे. (Ukraine War)
हेही वाचा-वाढत्या नागरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटते; BMC सांगणार यावरील उपाय
ट्रम्प यांनी रविवारी संध्याकाळी फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला जाताना पत्रकारांना सांगितले की, ‘‘आम्हाला मंगळवारी काहीतरी घोषणा करायला मिळू शकते. मी अध्यक्ष पुतिन यांच्याशी मंगळवारी बोलणार आहे. त्यापूर्वी शनिवारी व रविवारी आम्ही भरपूर काम केले आहे. युद्ध थांबवता येते का यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’ (Ukraine War)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community