Farmers Suicides : २४ वर्षांत ४९ हजार शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

58

राज्यात २४ वर्षांत तब्बल ४९ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. परंतु त्यांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आर्थिक कर्जापोटी अनेक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे उघड झाले आहे. (Farmers Suicides)

(हेही वाचा – Matunga Robotics कार पार्किंगला विरोध; पण येथील अनधिकृत वाहनांवरील कारवाईकडेही दुर्लक्ष)

सर्वाधिक २१,१२० शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात (Vidarbha) झाल्या आहेत. त्या खालोखाल मराठवाड्यात (Marathwada) १२,५१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांचा जीवनस्तर सुधारण्यासाठी कृषी विभागाच्या ३५ योजना आहेत. ‘डीबीटी’च्या लॉटरी पद्धतीमुळे गरजू शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळेलच, याची खात्री नसते.

पश्चिम विदर्भातील ५, पूर्व विदर्भातील एक आणि मराठवाड्यातील ८ अशा १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाते. अमरावती (Amravati) विभागातील पाच जिल्ह्यांत गतवर्षी १,०५१, नागपूर (Nagpur) विभागातील वर्धा जिल्ह्यात १०४, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ९४८ अशा २,१०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील ९८१ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र, ४१४ अपात्र, तर ७११ प्रकरणे प्रलंबित आहेत. आत्महत्या प्रकरणात २३ जानेवारी २००६ च्या आदेशानुसार एक लाख रुपयांची मदत देय आहे. ३० हजारांचा चेक तर ७० हजार पोस्ट/बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसाच्या नावे जमा करण्यात येतात.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी केली आत्महत्या ?

विदर्भ

यवतमाळ ६,२३०
अमरावती ५,४०४
बुलढाणा ४,४५३
अकोला ३,१४१
वाशिम २,०५८

नागपूर विभाग

वर्धा २,४६४

छ. संभाजीनगर विभाग

बीड ३,१७०
नांदेड २,०१२
धाराशिव १,७३८
छ. संभाजीनगर १,६८१
परभणी १,२५१
जालना १,०७९
लातूर ९८५
हिंगोली ५७६ (Farmers Suicides)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.