तळपत्या उन्हात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी ताकापेक्षा चांगलं पेय असूच शकत नाही. म्हणूनच ताकाला अमृत म्हटलं जातं. दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने अन्नपचन चांगल्या प्रकारे होतं. ताक फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर ते दोन दिवसांपर्यंत ताजे राहते. ताक तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही. ताक हे तयार करायला सोपे असते. तसंच ते वाढवणे आणि साठवणेही सोपे असते. आज आम्ही तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन ताकाची रेसिपी (Masala Taak Recipe) सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात..
(हेही वाचा – Torres Scam : २७ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल)
ताक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
- १ कप घट्ट आणि थंडगार दही (Dahi)
- २ कप पाणी
- १/२ चमचा आलं (बारीक चिरलेलं)
- १ हिरवी मिरची (मध्यम चिरलेली)
- १/२ चमचा भाजलेली जिरे पावडर
- २ टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
- चवीनुसार मीठ (Salt)
फोडणीसाठी लागणारं साहित्य
- १ टेबलस्पून तेल
- १ टेबलस्पून जिरे (Cumin)
- १ टेबलस्पून कढीपत्ता बारीक चिरलेला
(हेही वाचा – विमानतळापासून Prepaid Auto रिक्षासेवा सुरु करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश)
ताक तयार करण्याची कृती
- सुरुवातीला एका भांड्यात १ कप ताजे दही (Dahi) काढून घ्या.
- त्यात २ कप पाणी घाला.
- मग ते मिश्रण फेसाळ होईपर्यंत फेटून घ्या.
- या फेसाळ आणि मलईदार मिश्रणामध्ये इतर सर्व साहित्य घाला.
- आता पुन्हा चांगले मिसळून घ्या आणि बाजूला ठेऊन द्या.
- त्यानंतर फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा.
- त्यात जिरे (Cumin) घाला आणि ते तडतडल्यावर कढीपत्ता घाला. तोही फुटू द्या.
- सर्वांत शेवटी या फोडणीमध्ये ताक घाला.
- ते चांगले मिसळा आणि थंडगार करून सर्व्ह करा.
- मलईदार थंडगार ताक तयार आहे!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community