शिक्षक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा ; Vikram Kale यांची मागणी

52
शिक्षक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा ; Vikram Kale यांची मागणी
शिक्षक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करावा ; Vikram Kale यांची मागणी

नगर जिल्ह्यातील शिक्षक विजय नागरगोजे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य विक्रम काळे (Vikram Kale) यांनी केली आहे. शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्‍नावरून ही आत्महत्या झाल्याचे स्पष्ट असून, दोषी संस्थेविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

“२०२० मध्ये शिक्षकांना वेतन देण्याचा शासन निर्णय झाला होता. मात्र, आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. यामुळे शिक्षकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, नागरगोजे सरांनी वेतनासाठीच शेवटी आयुष्य संपवले,” असे काळे (Vikram Kale) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Masala Taak Recipe : मसाला ताक बनवताना कोणकोणते पदार्थ घालायचे, म्हणजे उष्णता जाईल पळून?)

विक्रम काळे (Vikram Kale) यांनी नागरगोजे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. “या कुटुंबाला सरकारने किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

या प्रकरणी पुढील पाठपुरावा करण्यासाठी आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेणार असल्याची माहितीही विक्रम काळे (Vikram Kale) यांनी दिली.

“शिक्षकांचा मूलभूत हक्क असलेल्या वेतनासाठी जर कोणी जीव देत असेल, तर ही व्यवस्थेची लाज आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी,” अशी मागणीही काळे (Vikram Kale) यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.