नागपूरमधील जमावाने घडवलेल्या दंगलप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. “ही घटना पूर्णपणे पूर्वनियोजित वाटते. मोबिनपुरा परिसरात नेहमी गाड्या असतात, पण काल तिथे कुठलीही गाडी नव्हती, यावरून हे स्पष्ट होतं,” असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
“जमावाने घरांवर हल्ले केले, जाळपोळ केली, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही जणांना जीव वाचवावा लागला. पोलिसांवर दगडफेक झाली, काहींवर कुऱ्हाडीने हल्ला झाला. अग्निशमन दलाच्या जवानांवरही हल्ला करण्यात आला. हे सगळं अत्यंत दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
(हेही वाचा – Maruti e Vitara : मारुतीची पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एसयुव्ही ई व्हिटाराच्या चाचण्या सुरू, लवकरच दिसणार भारतीय रस्त्यांवर)
“काही मंदिरांतील फोटो जाळण्यात आले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलिस मुळाशी जाऊन तपास करतील आणि दोषींना शोधून कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
“नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे, पण समाजात तेढ निर्माण करण्याचा डाव केला जात आहे. सर्वांनी शांतता राखावी आणि सहकार्य करावं,” असे आवाहनही शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं.
औरंगजेबाच्या समर्थनावर टीका करत शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “औरंगजेब कोणाचा होतो? त्या आंदोलनकर्त्यांनी संभाजी महाराजांचा (chatrapati sambhaji maharaj) इतिहास वाचला पाहिजे, ‘छावा’ पाहिला पाहिजे. औरंगजेबाच्या समर्थनाचा अर्थ देशद्रोह आहे. महाराष्ट्रासाठी औरंगजेबाची कबर ही कलंक आहे, हा कलंक पुसला पाहिजे, ही लोकांची भावना आहे,” असे ते म्हणाले.
अबू आझमी (Abu Azmi) यांच्यावरही निशाणा साधत शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “विशिष्ट मतांसाठी ते बोलत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित केले पाहिजे.”
“मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सकपाळांवरही (Harshwardhan Sapkal) कारवाई झाली पाहिजे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी,” असा इशाराही त्यांनी दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community