Nagpur Violence : औरंग्याची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांचा विधानभवनात आक्रमक आंदोलन

76
Nagpur Violence : औरंग्याची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांचा विधानभवनात आक्रमक आंदोलन
Nagpur Violence : औरंग्याची कबर हटवण्यासाठी शिवसेना आमदारांचा विधानभवनात आक्रमक आंदोलन

छत्रपती संभाजी महाराजांवर (Chhatrapati Sambhaji Maharaj) अमानुष छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीविरोधात आज शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. औरंग्याचा धिक्कार करीत त्याची कबर तातडीने हटवण्याची मागणी आमदारांनी केली. (Nagpur Violence)

या आंदोलनात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विजय शिवतारे, आमदार संतोष बांगर, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार संजय गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Nagpur Violence)

(हेही वाचा – नागपूर घटनेवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा तीव्र शब्दात इशारा; “समाजकंटकांना सोडणार नाही”)

“औरंग्याची कबर हटवून तिथे केवळ थडगं ठेवा आणि त्या थडग्याजवळ चार जोडे ठेवा, जेणेकरून येणारे-जाणारे त्या थडग्याला जोडे मारतील,” अशी तीव्र टीका मंत्री भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी केली. “औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्यांना हिंदुस्थानात राहण्याचा अधिकार नाही,” असे संतोष बांगर म्हणाले. (Nagpur Violence)

आंदोलनादरम्यान “शंभू राजांचा अमानुष छळ करणाऱ्या औरंग्याची कबर उखडून टाका” असे बॅनर शिवसेना आमदारांनी फडकावले. या घोषणांनी विधानभवन (Vidhan Bhavan) परिसर दणाणून गेला. (Nagpur Violence)

शिवसेना आमदारांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्राच्या मातीतील कलंक असलेल्या औरंग्याची कबर तातडीने हटवली पाहिजे,” आणि या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. (Nagpur Violence)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.