Nagpur Violence : नागपूरमध्ये सापडले अर्धा ट्रक दगड

88

नागपूरच्या दंगलीत सापडले अर्धा ट्रक दगड सापडले आहेत. दंगलखोरांनी आतापर्यंत ४८ वाहनांची तोडफोड केली आहे, तर दोन क्रेन जाळल्या आहेत. औरंगजेबाची कबर (Aurangzeb’s tomb) हटवण्यावरून सुरु झालेल्या वादाला नागपुरात सोमवारी हिंसक वळण लागले. शिवजयंतीच्या दिवशीच नागपुरच्या महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. (Nagpur Violence) या हिंसाचाराच्या घटनेत काही पोलिसांवरही हल्ले करण्यात आले. मंगळवार, १८ मार्च या दिवशी सकाळपासून पोलिसांनी परिसरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

(हेही वाचा – नागपूर घटनेवर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा तीव्र शब्दात इशारा; “समाजकंटकांना सोडणार नाही”)

पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. पोलिसांकडून संपूर्ण परिसरातील दगड जमा करण्यात आले. यामध्ये तब्बल अर्धा ट्रक दगड पोलिसांनी जमा केले आहेत. सोमवार, १७ मार्चच्या रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या महाल परिसरातील नागरिकांमध्ये एकच धावपळ झाली. पोलिसांनी मोठी कुमक मागवून बंदोबस्त तैनात केला.

महाल परिसरात एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली असून गाड्यांचे नुकसान करण्यात आले. समाजकंटकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फिरकवले होते. हे दगड आज सकाळी जमा करण्यात आले. यावेळी एका छोट्या ट्रकमध्ये दगड जमा केले असता ते अर्धा ट्रक होते. त्यामुळे जमावाने दंगलीची पूर्ण तयारी केली होती, असाही आरोप होत आहे. (Nagpur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.