Nagpur violence : पोलिसांवरील हल्ला कदापि सहन करणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलिसांत दाखल झाले आहेत. तहसील पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

45

नागपुरात सोमवार, १७ मार्चला दुपारपासून दंगलखोर मुसलमानांनी हिंसा (Nagpur violence) केली. त्यावर मंगळवारी विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जमावाने पोलिसांवर हल्ले केले. पोलिसांवरील हल्ले कदापि सहन केले जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करणार, असा इशारा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? 

घटनास्थळी जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली. वाहनांची जाळपोळ झाली. ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसत आहे. औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा (Nagpur violence) झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा Nagpur Violence : नागपूर दंगल प्रकरणावर नितेश राणे यांचा हल्लाबोल; “जिहादी मानसिकतेच्या कारट्यांना चोप देणार”)

११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलिसांत दाखल झाले आहेत. तहसील पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत. या घटनेत (Nagpur violence) एक क्रेन, दोन जेसीबी व काही चारचाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेत ३३ पोलीस जखमी झाले आहेत. त्यात तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. एकूण ५ नागरिक जखमी झाले आहेत. तिघांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णालयात आहेत. त्यापैकी एक आयसीयूत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था हाती घेण्याची कुणालाही परवानगी दिली जाणार नाही. एक नक्की सांगतो की, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवर झालेला हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशा वेळी पोलिसांवर केलेला हल्ला करणे चुकीचे आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.