केंद्र सरकारविरुद्ध जनमत भडकवण्याचा आरोप असलेल्या हंगेरियन वंशाचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्याशी संबंधित संस्थांवर ईडीने छापा टाकला आहे. दि. १८ मार्च रोजी सकाळी ओपन सोसायटी फाऊंडेशनशी संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय, ओपन सोरोस फाउंडेशन (OSF) शी संबंधित इतर काही कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. ‘फेमा’ (Foreign Exchange Management Act, 1999) कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा : मोफत शिक्षणाच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मांतराचा कट; Morari Bapu यांची गृह राज्यमंत्र्यांकडे तक्रार)
दरम्यान अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या (Amnesty International) माजी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला (Amnesty International) भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, बेकायदेशीरपणे परदेशी निधी मिळाल्याचा आरोप असल्याने त्यांची बँक खातीही सरकारने जप्त करण्याचे आदेश दिले होते.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ईडीने (ED) ओएसएफ आणि काही इतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसरात छापे टाकले. ओएसएफ ही जॉर्ज सोरोस (George Soros) यांच्या आर्थिक सहायाने चालणारी संस्था आहे. असा आरोप आहे की OSF ने अनेक संस्थांना निधी दिला आणि या निधीचा वापर FEMA कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतो. आतापर्यंत OSF ने ईडीच्या कारवाईबाबत कोणतेही विधान जारी केलेले नाही.
मुळात जॉर्ज सोरोसच्या संस्थांनी २०२१ मध्ये भारतात ४ लाख डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले. परकीय चलन घोटाळ्याचा भाग म्हणून ओएसएफ आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या (International human rights organization) परिसराची झडती घेण्यात येत आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या (Amnesty International) माजी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला (Amnesty International) भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, बेकायदेशीरपणे परदेशी निधी मिळाल्याचा आरोप असल्याने त्यांची बँक खातीही सरकारने जप्त करण्याचे आदेश दिले होते.
हेही पाहा :