महाकुंभाच्या निमित्ताने भारताची भव्यता जगाने पाहिली; पंतप्रधान PM Narendra Modi यांचे विधान

24
महाकुंभाच्या निमित्ताने भारताची भव्यता जगाने पाहिली; पंतप्रधान PM Narendra Modi यांचे विधान
महाकुंभाच्या निमित्ताने भारताची भव्यता जगाने पाहिली; पंतप्रधान PM Narendra Modi यांचे विधान

महाकुंभाच्या (Mahakumbha) निमित्ताने संपूर्ण जगाने भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे (National awareness) साक्षीदार असून हे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. तसेच यामाध्यमातून आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांना देखील योग्य उत्तर मिळाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. लोकसभेत दि. १८ मार्च रोजी महाकुंभाच्या आयोजनावर भाष्य करताना ते बोलत होते.

( हेही वाचा : New India Co-op Bank Scam : राजकीय पक्षाच्या माजी सचिवाच्या भावाला बँक घोटाळा प्रकरणी अटक)

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येत (Ayodhya) झालेल्या राम मंदिर (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा सोहळ्याने आपल्या सर्वांना पुढील एक हजार वर्षांसाठी देश कसा तयारी करत आहे, याची जाणीव करून दिली. या वर्षी महाकुंभाने आपल्या विचारांना आणखी बळकटी दिली आहे. देशाची ही सामूहिक जाणीव आपल्याला देशाच्या ताकदीबद्दल सांगते. मानवी जीवनाच्या इतिहासात असे अनेक वळण येतात, जे भावी पिढ्यांसाठी उदाहरण बनतात.

आपल्या देशाच्या इतिहासातही असे काही क्षण आले आहेत, ज्यांनी देशाला जाणीव करून दिली. महाकुंभात (Mahakumbha) लोकांनी सोयी किंवा गैरसोयीची चिंता न करता सहभाग घेतला. आपल्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आहेत. आज भारतातील तरुणाई अभिमानाने आपली परंपरा, श्रद्धा आणि चालीरीती स्वीकारत आहे. एक देश म्हणून आम्हाला मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आपल्या वारशाशी जोडण्याची परंपरा ही आजच्या भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. महाकुंभात राष्ट्रीय चेतना दिसून आली. देशाच्या सामूहिक जाणीवेचे परिणाम महाकुंभमेळ्यादरम्यान (Mahakumbha) दिसून आले. महाकुंभावर (Mahakumbha) प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांची उत्तरे मिळाली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चेतना उदयास आल्याचे मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.