Nagpur Violence पूर्वनियोजित कट; मास्टरमाईंड शोधून कठोर कारवाई करा : भाजपा गटनेते प्रविण दरेकर

44

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री घडलेली दंगल (Nagpur Violence) ही पूर्णपणे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत, या हिंसाचारामागील मास्टरमाईंड शोधून काढा आणि दंगेखोरांवर कठोर कारवाई करा, अशी जोरदार मागणी विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली.

या घटनेच्या निषेधार्थ विधानपरिषदेत आवाज उठवत दरेकर म्हणाले, “औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांची मजल किती वाढली आहे, हे या घटनेवरून दिसून आले आहे.

दरेकर यांनी सांगितले की, या घटनेत दंगलखोरांनी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक केली, रस्त्यावर उभ्या असलेल्या शेकडो दुचाकी फोडल्या, वाहनांची जाळपोळ केली आणि दुकानांची तोडफोड केली. “महाल परिसरातील जुन्या महाविद्यालयाच्या मागील भागात समाजकंटकांकडून विशेष लक्ष करून तोडफोड करण्यात आली.” (Nagpur Violence)

सायंकाळी तणाव निर्माण झाल्यानंतर प्रथम पोलिसांनाच जमावाने लक्ष्य केल्याचे दरेकर यांनी सांगितले. “चिटणीस पार्क परिसरात पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली तेव्हा लोकांनी दगडफेक केली. पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि ते गंभीर जखमी झाले.”

या हल्ल्यात १५ हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. दंगेखोरांनी अग्निशमन दलाच्या जवानांवरही दगड, चाकू आणि तलवारी फेकल्या. “घराजवळ सहज न सापडणारे मोठे दगड, टोकदार स्टाईलचे तुकडे आणि लाकडी दांडे यासाठी वापरण्यात आले. यावरून हा कट किती पूर्वनियोजित होता, याचा अंदाज येतो,” असे दरेकर म्हणाले.

(हेही वाचा Nagpur violence : पोलिसांवरील हल्ला कदापि सहन करणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा)

अफवा आणि बाहेरून आणलेली मंडळी – दंग्याचा डाव

दरेकरांनी विधानपरिषदेत सांगितले की, “घटनेच्या वेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या गेल्या. या अफवा पसरवणारे कोण होते, याचा पोलिसांनी शोध घ्यावा. बाहेरून लोकं आणून हा दंगा (Nagpur Violence) घडवून आणला गेला. ही एक भयानक कट रचना होती.”

ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. आता राज्यात फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरू आहे. म्हणून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा डाव खेळला जात आहे. डोकी भडकावण्याचे काम सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

मास्टरमाईंडचा शोध घ्या, कठोर शिक्षा करा – दरेकरांची मागणी

“या घटनेची सखोल चौकशी करून यामागील मास्टरमाईंड कोण आहे, हे शोधून काढा आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी आमची ठाम मागणी आहे,” असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

दरेकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांचा महाराष्ट्रात पाडाव होणारच. राज्य सरकारने या घटनेकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कठोर पावले उचलली पाहिजेत.”

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.