राज्याचे भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार; Minister Ashish Shelar यांची घोषणा

हे सांस्कृतिक केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरेल.

54

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी विधानसभेत केली.

अॅड. शेलार यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. या परंपरेचे जतन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. याच उद्देशाने राज्याच्या राजधानीत एक भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

भव्य ऑडिटोरियम, कला दालने आणि रिसर्च सेंटर

हे सांस्कृतिक केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाण-घेवाणीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरेल. यामध्ये भव्य ऑडिटोरियम, विविध कला दालने, संशोधन केंद्र, प्रदर्शन दालने आदी सुविधा असतील. महाराष्ट्राच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे प्रदर्शन या केंद्रातून देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, असेही शेलार (Minister Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा पुण्यातील इमामबाराचा ट्रस्टला Waqf दर्जा देण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय Bombay High Court कडून रद्द)

राज्य वस्तुसंग्रहालयात ऐतिहासिक ठेवा जतन होणार

राज्य वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून प्राचीन भारतीय वारसा आणि ऐतिहासिक वस्तूंचे जतन केले जाणार आहे. विविध उत्खनन, शोध मोहिमा आणि ऐतिहासिक संशोधनातून सापडलेल्या मूर्ती, शस्त्रे, शिलालेख, ताम्रपट, वस्त्र, चित्रकला, वास्तुशिल्प अवशेष आणि दुर्मिळ कलाकृती इथं साठवल्या जातील. यामुळे पुढील पिढ्यांना इतिहासाचा समृद्ध वारसा पाहता येईल. (Minister Ashish Shelar)

वांद्रे-कुर्ला संकुलात भूखंड निश्चित

या दोन्ही प्रकल्पासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील अधिसूचित क्षेत्रातील मौजे वांद्रे सर्वे नंबर ३८१, न.भु.क्र. ६२९ (पै) येथील १४,४१८ चौरस मीटर भूखंड निश्चित करण्यात आला आहे. हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास विनामूल्य हस्तांतरित करण्यात येणार आहे.

“या ठिकाणी भव्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारले जाईल. हे केंद्र केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरेल,” असे अॅड. आशिष शेलार (Minister Ashish Shelar) यांनी आपल्या घोषणेत स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.