राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेच्या (शिंदे गट) वाढत्या प्रभावामुळे राज्यभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकृत प्रवेश केला.
दापोली येथील उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक नेते संजय कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. त्यानंतर संभाजीनगर येथून माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती राजूनाना मगर यांच्यासह डॉ. राजू डोंगरे, राम हरी जाधवे, बाबासाहेब जगताप यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. यामुळे मराठवाड्यात शिवसेनेच्या गटाची ताकद अधिक वाढली आहे.
(हेही वाचा पुण्यातील इमामबाराचा ट्रस्टला Waqf दर्जा देण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय Bombay High Court कडून रद्द)
मुंबईतीलही काही महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश माने, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक, गोरेगावच्या माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ताकद दाखवली आहे. या वेळी मुंबईतील विविध पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट झाली असून आगामी निवडणुकीत हे नेते शिंदे गटाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community