आता BMC प्रशासन निघाले रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करायला, पण त्या २० ठिकाणांचे काय?

1132
आता BMC प्रशासन निघाले रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करायला, पण त्या २० ठिकाणांचे काय?
आता BMC प्रशासन निघाले रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करायला, पण त्या २० ठिकाणांचे काय?

मुंबईतील रेल्वे स्थानकांसह २० ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात असमर्थ ठरणाऱ्या महापालिका प्रशासन आता रेल्वे स्थानक परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करणार आहे. मुंबईतील (Mumbai) सर्व रेल्वे स्थानकांलगतचे परिसर पादचाऱ्यांना सुलभपणे चालता यावे याकरता अशाप्रकारे मोकळे ठेवण्यात यावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी दिले आहेत.त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात किमान १५० मीटर अंतरावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यास जोशी यांचे आदेश खरोखरच महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस पाळतात का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. (BMC)

(हेही वाचा : संभाजीनगरमध्ये Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबईतील (Mumbai) वाहतूक सुलभ आणि सोयीची व्हावी, पादचाऱ्यांना विनाअडथळा चालता यावे, या उद्देशाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, रस्त्यांची स्वच्छता, फेरीवालामुक्त परिसर आदी बाबींचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर पादचाऱ्यांना सुलभरित्या मार्गक्रमण करता यावे, या हेतूने नियमित कारवाईसोबत विशेष मोहीमसुद्धा हाती घेण्यात आली आहे.

याच अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एफ उत्तर विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी परिरक्षण, घनकचरा व्यवस्थापन, परवाना, अतिक्रमण निर्मूलन, इमारत प्रस्ताव, आरोग्य, आस्थापना, पाणीपुरवठा आदी विभागांचे पथक बनविण्यात आले. परिसर स्वच्छता, पदपथांवरील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत फेरीवाले हटवणे, बेवारस वाहने हटवणे, प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाई आदी बाबी या पथकांच्या संयुक्त मोहीमेत करण्यात आल्या. (Mumbai)

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) विविध प्रशासकीय विभागांच्या वतीनेही पादचाऱ्यांच्या निर्बंधमुक्त मार्गक्रमणासाठी अधिक तीव्रपणे कारवाई सुरू केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (CSMT), चर्चगेट रेल्वे स्थानक, मशीद रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रेल्वे स्थानक, रे रोड रेल्वे स्थानक, डॉकयार्ड रेल्वे स्थानक, माझगाव रेल्वे स्थानक, भायखळा रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणांचा समावेश आहे. विशेषकरुन, वर्दळीच्या ठिकाणी पदपथांवरुन चालताना पादचाऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हे सुनिश्चित केले जात आहे. यापुढेही नियमितपणे कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने जी २० ठिकाणे फेरीवालामुक्त करण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर, दादर रेल्वे स्थानक (Dadar Railway Station) पश्चिम बाजू, दादर रेल्वे स्थानक पूर्व बाजू, अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व बाजू, अंधेरी रेल्वे स्थानक पश्चिम बाजू, मालाड रेल्वे स्थानक पश्चिम बाजू, मालाड रेल्वे स्थानक पश्चिम, बोरीवली रेल्वे स्थानक पश्चिम बाजू, कुर्ला रेल्वे स्थानक पश्चिम बाजू, घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व व पश्चिम बाजू आदी रेल्वे स्थानक परिसरांचा समावेश आहे. मात्र, यातील दादर, अंधेरी, घाटकोपर, मालाड, कुर्ला आदी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे. केवळ बोरीवली रेल्वे स्थानक पश्चिम बाजूलाच कारवाई केली जात आहे. त्यामुळे किमान आता अतिरिक्त् आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेल्या निर्देशानुसारच तरी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जाणार आहे कि पुन्हा या कारवाईचा फियास्कोच उडणारच आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.