स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ब्रिटिशांकडून पेन्शन (Pension) घेतल्याची टीका नेहमीच होत असते. मात्र नुकत्याच हाती आलेल्या ब्रिटिशकालीन (British) कागदपत्रांवरून सिद्ध झाले की, हे पेन्शन नसून निर्वाह भत्ता दिला जात होता. त्याचप्रमाणे केवळ सावरकरच नव्हे तर एम के गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांनाही तसाच निर्वाह भत्ता मिळत होता.
काँग्रेस, डाव्या वळवळीचा बुरखा फाटला
यासंदर्भात इतिहास आणि वीर सावरकर संशोधक चंद्रशेखर साने यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करून सगळी कागदपत्रे जनतेसमोर ठेवत सावरकर यांच्यावर आरोप करणाऱ्यांना उघडे पाडले. साने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सावरकरांना पेन्शन वीर म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेसी डाव्या वळवळीची, ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींचा बुरखा फाटला. राष्ट्रीय अभिलेखागारात जवळपास ३७० जणांना ब्रिटीश (British) ‘पेन्शन’ देत होते, असा उल्लेख आहे. तर ७०० जणांना या ‘पेन्शन’ ची गरज नाही, असा शेरा मारुन नाकारण्यात आले. ही फाईल शोधण्यात मला समीर कस्तुरे यांच्या पोस्टची मदत झाली. एम.के. गांधी उर्फ महात्मा, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस आणि सुभाष चंद्र बोस तसेच सरहद्द गांधी म्हणवल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान इत्यादींचा ब्रिटीशांकडून (British) ‘पेन्शन’ खाणाऱ्यांत समावेश आहे.”
— Chandrashekhar Sane (@csanec) March 17, 2025
जवाहर और मोहनदास का भत्ता बहुत ज्यादा था !! 😡😡 https://t.co/H0jaBp6S9m
— prashant (@bhave2009) March 16, 2025
— Chandrashekhar Sane (@csanec) March 17, 2025
— Chandrashekhar Sane (@csanec) March 17, 2025
— Chandrashekhar Sane (@csanec) March 17, 2025
बदनामी करणारे हलकट
साने पुढे म्हणतात, “टीप १ – पेन्शन हा शब्द माझा नाही. पण काही डुरकणाऱ्या सुकरांना पटकन खूण पटावी, म्हणून हा शब्द वापरत आहे. इतरांनी अलाउंन्स अर्थात निर्वाह भत्ता, असे वाचावे. टिप २ – सावरकरांची बदनामी करणारे हलकट जाणीवपूर्वक पेन्शन हा शब्द वापरतात. परंतु ब्रिटीश कागदपत्रात सावरकर असोत कि अन्य सर्वांना अलाउंन्स म्हणजे भत्ता दिला असाच शब्द वापरतात. ज्यांना हा निर्वाहभत्ता मिळत होता, ते सर्व स्थानबद्ध बंदीवान असून ते आणि त्यांच्या कुटुंबाची चरितार्थाची सोय या काळात नव्हती म्हणून मानवतावादी दृष्टीने ब्रिटीश (British) सरकार असा भत्ता देत असत. मग ब्रिटीश फार दयाळू होते का? तर ते तसे नाही. जसे तुरुंगात कैद्यांना जेवणखाण, कपडे आणि पांघरुणे आणि बिन भाड्याची खोली देणे कोणत्याही सत्तेचे कर्तव्य असते त्याचप्रमाणे हे होते. तेवढेच याचे मूल्य. स्थानबद्ध असल्याने त्यांना स्थानबद्ध असेपर्यंत असा भत्ता देणे हे सत्ताधीशांचे कर्तव्य होते. त्यात ब्रिटीशांना (British) आपले न्यायाचे राज्य आहे हे दाखवण्याची हौस असल्याने, असे कायदे त्यांनी टप्प्याटप्प्याने केले. त्याचाच एक भाग म्हणून १९२८ ला हा कायदा आला, असे डॉ. य.दी. फडके आपल्या शोध सावरकरांचा या निबंधात म्हणतात.”
(हेही वाचा Nagpur Violence पूर्वनियोजित कट; मास्टरमाईंड शोधून कठोर कारवाई करा : भाजपा गटनेते प्रविण दरेकर)
भारतीयांना लुटुन घेतलेलाच पैसा
“या निर्बंधानुसार सावरकरांना मात्र भत्ता मिळत नसे. १९२४ ते १९२९ अशी पाच वर्षे स्थानबद्धतेत काढल्यानंतर सावरकरांच्या स्थानबद्धतेची मुदत ब्रिटीशांनी (British) पुढे दोन वर्षे वाढवली. त्यावेळी सावरकरांनी आपणास वकिली करुन उदरनिर्वाहासाठी प्राप्ती करायची परवानगी मागितली असता ब्रिटीशांनी ती मागणी फेटळून लावली. रत्नागिरी सारख्या मागास भागात अन्य नोकरी व्यवसायातून उत्पन्न नव्हते. अशा वेळी ब्रिटीश (British) देत असलेला हा भता म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना लुटुन घेतलेला पैसाच आहे आणि इतरांप्रमाणेच तो आपल्याला मिळावा आणि आपण तो आपल्या समाजकार्यासाठी खर्च करावा या हेतूने सावरकरांनी हा भत्ता मिळावा, असा अर्ज केला. त्यावेळी अत्यंत कष्टाने, मुश्कीलीने आणि नाईलाजाने ब्रिटिश (British) सरकारने अनेक प्रकारच्या काटछाटी करुन हा भत्ता मंजूर केला.”
‘पेन्शन महात्मा’ नाहीतर ‘पेन्शन सरदार’
साने यांनी पुढे म्हटले की, “हलकट कृतघ्न वृतीचे काही भारतीय या भत्त्याला उद्देशून सावरकरांना पेन्शन वीर म्हणून हिणवत असतात. त्यांना तसे म्हणावयाचे असल्यास, गांधी, पटेल, बोस, गफार खान यांचा उल्लेखही त्यांनी ‘पेन्शन महात्मा’ नाहीतर ‘पेन्शन सरदार’ म्हणून करावयास हरकत नाही, अशा शब्दांत साने यांनी सावरकरविरोधकांचा समाचार घेतला.
Join Our WhatsApp Community