Aadhar आणि Voting Card लिंक करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, विधान विभागाचे सचिव, UIDAI चे CEO आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली.

70

आधार (Aadhar) आणि मतदार ओळखपत्र (Voting Card) लिंक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे. संविधानाच्या कलम 326 आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार मतदार ओळखपत्र आधारशी (Aadhar) लिंक केले जाईल. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता.

(हेही वाचा पुण्यातील इमामबाराचा ट्रस्टला Waqf दर्जा देण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय Bombay High Court कडून रद्द)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव, विधान विभागाचे सचिव, UIDAI चे CEO आणि ECI च्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली. देशात निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर कायमस्वरुपी आणि शास्त्रीय तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SCP) आणि BJD सारख्या अनेक राजकीय पक्षांनी समान EPIC क्रमांक असलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता आयोगाने या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. पुढील तीन महिन्यांत डुप्लिकेट क्रमांक असलेल्या मतदार ओळखपत्रांना (Voting Card) नवीन EPIC क्रमांक जारी करतील. डुप्लिकेट क्रमांक असण्याचा अर्थ बनावट मतदार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.