विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे अतिरिक्त आयुक्त Dr. Amit Saini यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन

487
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे अतिरिक्त आयुक्त Dr. Amit Saini यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे अतिरिक्त आयुक्त Dr. Amit Saini यांचे महापालिका शिक्षकांना आवाहन

पहिली – दुसरीतील अभ्यासक्रम पूर्ण करून इयत्ता तिसरीत जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना लिहिता येणे, वाचता येणे यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे ‘निपुण भारत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता उपक्रमाचे दोन वर्ष बाकी आहेत. सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा. त्यासाठी इयत्ता तिसरीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा या तिन्ही टप्प्यांवर विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांनी केले.

( हेही वाचा : आता BMC प्रशासन निघाले रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करायला, पण त्या २० ठिकाणांचे काय?)

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धारित निकषांनुसार महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) समितीद्वारे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात मंगळवारी १८ मार्च २०२५ रोजी या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) बोलत होते. उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर (Dr. Prachi Jambhekar), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पहिली – दुसरीतील अभ्यासक्रम पूर्ण करून इयत्ता तिसरीत जाणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांना लिहिता येणे, वाचता येणे यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे ‘निपुण भारत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता उपक्रमाचे दोन वर्ष बाकी आहेत. सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा,असे सैनी यांनी याप्रसंगी बोलतांना आवाहन केले. तसेच शिकण्याबाबतची अक्षमता (learning Disability) असलेल्या मुलांची लवकर ओळख होणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा ही मुले खूप मागे पडतात. त्यामुळे अशा मुलांची ओळख पटविणे, त्यांना प्रशिक्षण देणे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठीही पुढाकार घ्यायला हवा. काळाची गरज ओळखून मुलांना ई – शिक्षण देणेही तितकेच गरजेचे आहे. मुलांच्या विकासावरही चर्चा व्हायला हवी, असे सैनी म्हणाले.

यासह लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोस्को कायदा) याबाबत महानगरपालिका शाळांमध्ये जनजागृती करा. मुलांमध्ये आर्थिक साक्षरता कशी वाढेल, याबाबतचे शिक्षण शाळांमध्ये सुरू केले आहे. त्याचेही मुलांना ज्ञान द्या, असे आवाहन डॉ. सैनी यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये असलेला नात्यांचा ओलावा पाहून मला समाधान वाटले, असेही त्यांनी नमूद केले. उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर म्हणाल्या, आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारात महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शिक्षक-शिक्षकांचा समावेश आहे. महानगरपालिका शाळांतील शिक्षक हे शिक्षण देण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतात. शाळांमध्ये नवनवीन उपक्रम राबवितात, असे डॉ. जांभेकर यांनी नमूद केले.

शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी प्रास्ताविकातून आदर्श शिक्षक पुरस्कारामागची संकल्पना मांडली. प्रातिनिधीक मनोगत व्यक्त करताना पुरस्कारप्राप्त सामिया शेख आणि शिल्पा बनसोड (Shilpa Bansod) यांनी आपापल्या शाळेत राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) शिक्षण विभागातील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक ज्ञानदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत, त्यांचा यथोचित गौरव करण्याची परंपरा सन १९७१ पासून सुरू आहे.

या शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) मानचिन्हाचे पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाकडून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील विविध विभागातील निवडक शिक्षकांचा ‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ प्राप्त ६ शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

पुरस्कारार्थींमध्ये २६ महिला शिक्षकांसह २४ पुरुष शिक्षकांचा समावेश

सन २०२३-२४ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १५८ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली. तसेच मराठी माध्यमाचे १०, इंग्रजी माध्यमाचे ५, हिंदी आणि उर्दू माध्यमाचे प्रत्येकी ६, गुजराथी भाषा एक, दाक्षिणात्य भाषा एक, विशेष शिक्षक ४, विशेष मुलांची शाळेतील एक शिक्षक, महानगरपालिका माध्यमिक शाळा ४, मान्यताप्राप्त खासगी अनुदानित व विनाअनुदानित १२ अशा एकूण ५० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.