महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी यांची घुसखोरी (Bangladeshi Infiltrators) कशी होते आणि त्यांची ‘मोडेस ऑपरेंडी’ काय आहे? याची सविस्तर माहीती राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.
खोटे आधारकार्ड सिद्ध करणे कठीण
“बांगलादेशी पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी (Bangladeshi Infiltrators) करतात. तिथे एजंट कार्यरत असतात. एजंटमार्फत या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारे आधारकार्ड आणि अन्य कागदपत्रे पैसे देऊन उपलब्ध करून दिली जातात. आणि मग ते अन्य राज्यात जातात तसे महाराष्ट्रातही येतात. काही घुसखोरांकडे असलेले आधारकार्ड हे खोटे आहे, हे काही वेळा त्या कार्डवरील कोड स्कॅन करूनही सिद्ध करता येत नाही आणि ९९ टक्के घुसखोरांकडे पश्चिम बंगालमधूनच कागदपत्रे उपलब्ध होतात,” अशी माहीती कदम यांनी मंगळवारी १८ मार्च २०२५ या दिवशी विधानसभेत दिली.
“अगोदर कुटुंबातील एकजण येतो, मग नातेवाईकांना बोलावू घेतो. त्यामुळे घुसखोरी (Bangladeshi Infiltrators) ही चिंतेची बाब असून, ती रोखण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. राज्य शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे,” अशी माहीती योगेश कदम यांनी दिली.
(हेही वाचा पुण्यातील इमामबाराचा ट्रस्टला Waqf दर्जा देण्याचा वक्फ ट्रिब्युनलचा निर्णय Bombay High Court कडून रद्द)
बोरीवलीत ५ हजार बांगलादेशी कामगार
भाजपा आमदार संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात बांगलादेशींचा मुद्दा उपस्थित केला. बोरीवलीत ५ हजार कामगार हे बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) आहेत. बीएमसी कंत्राटदारांकडे सगळे काम करणारे कामगार, इमारत बांधकाम कामगार, नारळवले, फेरीवाले हे सगळे बांगलादेशीच आहेत. बोगस आधारकार्ड तयार करून हे भारताचे नागरिकत्व मिळवतात, असा आरोप उपाध्याय यांनी केला.
दरवर्षी कारवाया वाढवल्या
त्यावर मंत्री योगश कदम म्हणाले, हा प्रश्न बोरीवलीपुरता सिमीत प्रश्न नाही. ठाणे, रायगड, जालना येथील कारखान्यांमध्ये कारवाई करुन बांगलादेशींना पकडण्यात आले आहे. २०२१ मध्ये १०९ बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) हद्दपार केले, २०२२ ला ७७, २०२३ ला १२७ हाकलले, २०२४ ला ७१६ बांगलादेशींना अटक केले आणि २०२ बांगलादेशी हद्दपार केले. तर यावर्षी २०२५ मध्ये मार्चपर्यंत ६०० बांगलादेशीवर कारवाई केली आहे. दरवर्षी कारवाया वाढवल्या आहेत. केंद्रातील आयबीकडून आलेल्या सूचनेनुसार कारवाया केल्या आणि करत आहोत.
नवीन ‘डिटेन्शन सेंटर’ तयार करणार
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी बांगलादेशी घुसखोरांचे (Bangladeshi Infiltrators) कोम्बिंग ऑपरेशन करा, डिटेन्शन कॅम्पचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर कदम यांनी पुढील दोन महिन्यात ८० क्षमतेचे डिटेन्शन कॅम्प तयार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community