९ महिन्यांनंतर Sunita Williams पृथ्वीवर परतल्या

116

नासाच्या (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. या दोघांनाही परतण्यासाठी इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पेसएक्सचे (SpaceX) ड्रॅगन यान (Dragon ship) पाठवले होते. त्यातून ते पृथ्वीवर परतले. नासाने या अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) यांच्यासोबत, क्रू-९ चे इतर दोन अंतराळवीर, निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील पृथ्वीवर परतले आहेत.

(हेही वाचा – Castella De Aguada : मुंबईतल्या वांद्रेमध्ये आहे कॅस्टेला डे अगुआडाचा किल्ला; जाणून घ्या समृद्ध इतिहास!)

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी ५ जून २०२४ रोजी बोईंग स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून अंतराळात रवाना झाल्या होत्या. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता; परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, नासाला स्टारलाइनर रिकामे करावे लागले आणि अंतराळवीरांना अवकाशात हलवावे लागले. तेव्हापासून त्या अंतराळात अडकल्या होत्या.

स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे

नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. तसेच सुनीता विल्यम्स यांनी ‘अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला’ म्हणूनही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. या अभ्यासात गुरुत्वाकर्षणाचा अंतराळातील द्रव प्रणालींवर काय परिणाम होतो, हे दिसून येते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.