-
ऋजुता लुकतुके
हे वर्षं नवनवीन इलेक्ट्रिक वाहनांचं आहं. तसंच कंपन्या आपली जुनी मॉडेलही नवीन स्वरुपात लोकांसमोर आणत आहेत. टाटा मोटर्सनीही तसाच एक प्रयत्न चालवलाय टाटा सिएरा (Tata Sierra ICE) ही आपली जुनी एसयुव्ही आधुनिक अवतारांत लोकांसमोर आणून. या गाडीची भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरू झालीय. त्यातून या गाडीचा लुक एव्हाना लोकांना समजला आहे. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये यापूर्वी या विराट गाडीचं दर्शन लोकांना झालेलं आहे. सुरुवीताला टाटा सिएराचं आयसीई (Tata Sierra ICE) व्हर्जन लोकांसमोर येईल. त्यानंतर ही गाडी ईव्ही स्वरुपातही उपलब्ध होईल.
जुन्या सिएरा प्रमाणेच नवीन गाडीचा युएसपी (USP) असेल जुन्या पण, भारदस्त डिझाईनमध्ये सध्या रस्त्यांवर दिसत असलेली गाडी ही बऱ्यापैकी स्टिकरनी झाकलेली आहे. पण, तिचा विराट आकार आणि भारदस्तपणा लपत नाही. सिएरा ही राजेशाही गाडी असेल असं टाटांनी पूर्वीही पाहिलं होतं. आता फक्त तिचा अवतार आधुनिक असेल.
पहिल्या नजरेत डोळ्यांसमोर येतं ते गाडीचं देखणं काळं ग्रिल आणि त्यावर असलेली एलईडी (LED) दिव्यांची माळ. तर मागच्या बाजूलाही दोन टेल लाईट्सबरोबर अशीच एलईडी (LED) दिव्यांची माळ असेल.
(हेही वाचा – पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास; ७ मिनिटे संपर्क तुटला; Sunita Williams यांचा परतीचा प्रवास कसा होता ?)
Tata Sierra Name To Be Resurrected In Both ICE & EV Guises – Key Detailshttps://t.co/D9X0DSTM7S pic.twitter.com/FmA6dAeFko
— GaadiWaadi.com® (@gaadiwaadi) March 14, 2025
आधीची सिएरा तीन दरवाजांची होती. आता प्रवाशांना बसणं आणि उतरणं सुटसुटीत जावं यासाठी पाच दरवाजे ठेवण्यात आले आहेत. टाटा कंपनीने या गाडीच्या डिझाईनसाठी पेटंट मिळवलं आहे. त्यामुळे ही गाडी वेगळी आणि डिझाईनमध्ये भन्नाट असेल असं बोललं जातंय. तर त्यातील वैशिष्ट्य अजून लोकांसमोर आली नसली तरी त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो,
(हेही वाचा – BMC School : खासगी संस्थांना दिलेल्या शाळा ताब्यात घ्याव्यात; मुख्य लेखापरिक्षकांनी नोंदवला निष्कर्ष)
- १०.२५ इंचांचा चालकासमोरील डिस्प्ले तर १२.३ इंचांचा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले
- पॅरोरमिक सनरुफ
- पॉवर्ड टेल-लाईट
- प्रिमिअम पद्धतीची साऊंड सिस्टिम
- व्हेंटिलेटेड सिट्स
चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी एबीएस (ABS) यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. यात चालकाने मार्गिका बदलल्यास सूचना देणे तसंच दोन गाड्यांमधील अंतर ठरावीक फुटांपेक्षा कमी झाल्यास स्वयंप्रेरणेनं ब्रेक लागणे अशी वैशिष्ट्यही असतील. ही गाडी १.५ लीटर टर्बो पेट्रोल आणि २.० लीटर क्रायोजेनिक इंधनावर चालणाऱ्या अशा दोन इंजिनांमध्ये उपलब्ध असेल.
टाटा मोटर्सनी आता इलेक्ट्रिक एसयुव्हींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे सिएराच्या आयसीई (Tata Sierra ICE) व्हर्जन नंतर २०२५ च्या उत्तरार्धात कंपनी सिएरा ईव्हीही बाजारात आणणार आहे. गाडीची किंमत २५ लाख रुपयांच्या घरात असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community