-
ऋजुता लुकतुके
अमेरिकन बाजारपेठेत जे स्थान टेस्लाला आहे. तेच स्थान बीवायडी कंपनीला चीनमध्ये (China) आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीत आणि आधुनिक डिझाईनमध्ये दोन्ही कंपन्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. बीवायडी कंपनीने (BYD Company) २०२३ पासून चीनमध्ये (China) इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला सुरुवात केली आहे. तेव्हापासून कंपनीला या क्षेत्रात यशही मिळालं आहे. आता यांगवांग यु८ आणि सीलायन या दोन एसयुव्ही गाड्यांसह कंपनी भारतीय बाजारपेठेंत दिमाखदार प्रवेश करणार आहे. यु८ गाडीत काही भन्नाट फिचर आहेत. (BYD U8)
गाडीची दोन्ही बाजूंची चाकं ही विरुद्ध दिशांना गोल फिरू शकतात. त्यामुळे कमीत कमी जागा व्यापून ही कार मागे वळू शकते किंवा १८० अंशांत वळू शकते. इतकंच नाही तर गाडीला स्नोर्केल बसवण्यात आलाय. त्यामुळे आतापकालीन परिस्थितीत गाडी चक्क अर्धा तास पाण्यावरही तरंगू शकते. तरंगत असताना गाडीतील इंजिन आपोआप बंद होईल. पण, आतल्या भागात वातानुकुलन यंत्रणा तरीही सुरू राहील. या गाडीत २.० लीटरचं पेट्रोल टर्बो इंजिन आहे. पण, हे इंजिन चाकांना जोडलेलं नाही. म्हणजे या इंजिनावर गाडी चालत नाही, तर गाडीतील बॅटरी चार्ज होते. गाडीतील टाकी ७५ लीटरची आहे. आणि इतक्या इंधनात ही गाडी १,००० किमीपर्यंतचा प्रवास करेल एवढी बॅटरी चार्ज होते. गाडी शून्य ते १०० किमींचा वेग अगदी ३ सेकंदांत गाठू शकते. (BYD U8)
(हेही वाचा – Tata Sierra ICE : टाटा सिएरा आयसीईचं भारतात टेस्ट ड्रायव्हिंग सुरू, समोर आले काही अनोखे फिचर)
BYD Yangwang U8 tank turn#autoexpo #rushlane pic.twitter.com/SUTqbuwVCg
— RushLane (@rushlane) January 18, 2025
यांगवांग यु८ (Yangwang U8) ही गाडी सध्या एकट्या चीनमध्ये (China) विकली जात आहे. अलीकडेच कंपनीने ऑस्ट्रेलियात शिरकाव केला असून, तिथे ही गाडी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. पण, भारतात ही गाडी नेमकी कधी येणार याचा काहीही अंदाज नाही. गाडीतील बॅटरी ही ४९ किलोवॅट क्षमतेची आहे. आणि ३० टक्के ते ८० टक्के चार्जिंगची मजल या बॅटरीला १८ मिनिटांत गाठता येते. गाडीत आधुनिक पद्धतीची एलईडी (LED) दिव्यांची माळ आहे. आतून प्रशस्त असलेल्या या गाडीत चालकासमोरच्या डिस्प्लेबरोबरच मध्यभागी एक डिस्प्ले असेल. तर मागच्या सिटना दोन स्वतंत्र डिस्प्ले असतील. यु८ गाडी भारतात येईल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. पण, आली तर रेंजरोव्हर, बीएमडब्ल्यू एक्स७ आणि मर्सिडिज जीएलएस या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल. (BYD U8)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community