Mudra Loans: राज्यातील साडेदहा लाख कर्जदारांनी थकवले मुद्रा कर्ज; बँकर्स अहवालातून माहिती उघड

57

Mudra Loans : देशातील मध्यमवर्गीयांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने 2015 मध्ये मुद्रा ही योजना सुरू केली होती. या योजनेत लाखों रुपयांपर्यंतचे कर्ज कुठल्याही गॅरंटीशिवाय दिले जाते. विशेष म्हणजे, या योजनेंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. या योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण, अशा तीन श्रेणींमध्ये कर्ज (loan) दिले जाते. याअंतर्गत मागील ९ वर्षांत राज्यातील ६१ लाख ७२ हजार जणांना कर्ज वाटप केले. त्यातील १० लाख २९ हजार कर्जदारांनी तब्बल ५ हजार ६६८ कोटींचे कर्ज थकविले. या योजनेंतर्गत विनातारण कर्ज सुविधेचा या थकबाकीदारांनी (Mudra loan defaulter) गैरफायदा घेतल्याने बँकांचा एनपीए १२.२० टक्क्यांनी वाढला आहे. हे वास्तव राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून (State Level Bankers Committee Reports) पुढे आले आहे. (Mudra Loans)

(हेही वाचा – Pune University चे वसतिगृहच बनले मुलींचा दारूचा अड्डा; तक्रार करूनही दुर्लक्ष)

मुद्रा कर्ज थकबाकीत राज्यात परभणी नंबर वन थकबाकीदारांत टॉप टेन शहर (रक्कम कोटीत) जिल्हा    कर्जदार    कर्ज    थकबाकीदार    थकीत     टक्के

१) परभणी    १,०९,०००    ८०२    ३६,०००    २४४    ३१
२) हिंगोली    ७७,०००    ४२३    २१,६००    ९२    २२
३) जालना    १,०२,०००    ७८९    २४,८५०    १५५    २०
४) छ. संभाजीनगर    २,४८,०००    १,८४८    ६०,२५०    ३५०    १९
५) जळगाव    २,४८,०००    १,५६३    ५९,०००    २३१    १५
६) अकोला    १,१७,०००    ६०२    २२,९००    ८५    १४
७) ठाणे    २,०९,०००    २२    ५२,०००    २९२    १३.४०
८) सोलापूर    ४,३४,०००    २,७००    ७३,०००    ३५४    १३
९) नागपूर    ५,२२,०००    २,९४३    ६३,०००    ३५७    १२
१०) बीड    १,२५,०००    ८७३    २१,८००    ११०    १२.५०

९ वर्षांतील परिस्थिती
६१,७२,००० लोकांना कर्ज.
४६,४५० कोटी कर्ज वाटप.
५,६६८ कोटी कर्ज थकीत.
१२.२०% एनपीए.

(हेही वाचा – Tata Sierra ICE : टाटा सिएरा आयसीईचं भारतात टेस्ट ड्रायव्हिंग सुरू, समोर आले काही अनोखे फिचर)

२०१५ ते २०१९ या कालावधीतील मुद्रा कर्जाची थकीत रक्कम मोठी आहे. अनेकांनी बनावट दरपत्रक सादर केले. कर्ज मंजुरी होईपर्यंत सेटअप तयार केले व मंजुरीनंतर परस्पर विकले. कर्जाची रक्कम इतरत्र वळवली. काही बँकांनी (Bank)  मागणीपेक्षा कमी रकमेचे कर्ज दिले, यामुळे कर्जदारांचे उद्योग, व्यवसाय उभे राहू शकले नाहीत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.