-
ऋजुता लुकतुके
डिस्नी हॉटस्टार (Disney Hotstar) आणि जिओ (JIO) यांच्या विलिनीकरणानंतर जिओस्टार असं एक नवीन ओटीटी व्यासपीठ तयार झालं आहे. त्यामुळे आयपीएलच्या (IPL 2025) चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की, आयपीएलचे सामने नक्की कुठे बघायचे आणि ते पहिल्यासारखेच मोफत बघता येतील का? कारण, आधी जिओ कंपनीने आपल्या जिओ सिनेमा ॲपवर गेली दोन वर्षं सामने मोफत दाखवले होते. आताही जिओ कंपनीने आपल्या जिओ सिमकार्डवर काही सवलती जाहीर करून चाहत्यांना मोफत आयपीएलची सोय करून दिली आहे.
येत्या २२ मार्चला कोलकाता इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) असा सलामीचा आयपीएलचा (IPL 2025) सामना रात्री साडेसात वाजता रंगणार आहे. आणि हा सामना बघण्यासाठी जिओ कंपनीने काही प्लान बाजारात आणले आहेत. तुम्ही नवीन जिओ सिम खरेदी करून त्यावरून महिन्याभरासाठी २९९ रुपयाांचा प्लान घेतलात, तर तुम्हाला या प्लानबरोबर आयपीएलचं थेट प्रक्षेपण मोफत बघता येईल. वायकॉम कंपनीने २०२३ साली आयपीएलच्या थेट प्रसारणाचे हक्क ३ अब्ज अमेरिकन डॉलर मोजून पाच वर्षांसाठी खरेदी केले आहेत.
(हेही वाचा – Konkan मध्ये सातत्याने लाईट जाण्याच्या समस्येतून आता होणार सुटका; किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करणार)
त्यांनी ओटीटी पैकी जिओ सिनेमावर (Jio Cinema) गेली दोन वर्षं आयपीएल (IPL 2025) मोफत दाखवली. आता यंदा त्यांनी मोफत प्रसारणाची पद्धत बदलली आहे. नवीन सिमसाठी किमान २९९ रुपये महिन्याचा प्लान आणि आधीपासून जिओ सिम असेल तर आयपीएल सामन्यांचे १०० रुपयाचे टॉप अप तुम्हाला करावे लागेल. तुम्हाला ४के दर्जाचं प्रसारण यात मिळेल.
दुसरा मार्ग असेल तो जिओ फायबर सेवा घेण्याचा. नवीन जिओ फायबर कनेक्शन घेतलंत तर यात तुम्हाला ९० दिवस जिओस्टार मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आयपीएल (IPL 2025) बघण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल पाहा,
- जिओचं नवीन सिम १७ ते ३१ मार्च या कालावधीत तुम्हाला घ्यावं लागेल. यात तुम्ही मासिक २९९ किंवा त्या पुढील प्लान घेतलात, तर तुम्हाला आयपीएल (IPL 2025) मोफत पाहता येईल.
- आता ज्यांच्याकडे जिओ सिम आहे, त्यांना मासिक २९९ किंवा त्या पुढील प्लान रिचार्ज करावा लागेल
- ज्यांनी १७ मार्चपूर्वीच रिचार्ज केलं असेल त्यांना १०० रुपयांचं टॉप अप करून आयपीएल पॅक घ्यावं लागेल.
- विशेष आयपीएल पॅक २२ मार्चपासून सुरू होईल. आणि त्याची मुदत ९० दिवसांची असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community