IPL 2025 : आयपीएलमध्ये लिलावानंतरही खेळाडू बदलता येतात का? नियम काय सांगतो?

दुखापती किंवा इतर कारणांमुळे फ्रँचाईजींनी अलीकडे खेळाडू बदलले आहेत.

39
IPL 2025 : आयपीएलमध्ये लिलावानंतरही खेळाडू बदलता येतात का? नियम काय सांगतो?
IPL 2025 : आयपीएलमध्ये लिलावानंतरही खेळाडू बदलता येतात का? नियम काय सांगतो?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) अलीकडेच कॉर्बिन बॉशला (Corbin Bosch) आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. लिलावात हा खेळाडू नव्हता. त्यानंतरही त्याच्या नावाची चर्चा नव्हती. मधळ्या काळात तो पाकिस्तान लीग खेळणार असल्याचं जाहीर झालं होतं. असं असताना अचानक तो मुंबईकडे आल्यामुळे दोन लीगमधील आणि खासकरून भारत आणि पाकिस्तानमधील लीगच्या द्वंद्वाविषयी चर्चा रंगली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉश विरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. अशावेळी आयपीएलमधील (IPL 2025) बदली खेळाडूंविषयीचे नियम नेमके काय आहेत ते बघूया. किंवा लिलावानंतरही खेळाडू आपल्या संघात कसे सामील करता येतात त्याचाही नियम पाहूया,

लिलावादरम्यान जिंकलेल्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली किंवा अन्य कारणांमुळे तो संबंध हंगामात उपलब्ध होऊ शकणार नसेल, तर त्याच्याकडे असलेली कौशल्य असलेला दुसरा खेळाडू फ्रँचाईजीला बदलता येतो. या हंगामातील पहिले १२ सामने होईपर्यंत फ्रँचाईजी अशाप्रकारे बदली खेळाडू करारबद्ध करू शकतात.

(हेही वाचा – Konkan मध्ये सातत्याने लाईट जाण्याच्या समस्येतून आता होणार सुटका; किनारपट्टीवरील वीज वाहिन्या भूमिगत करणार)

आयपीएलमध्ये (IPL 2025) फ्रँचाईजीबरोबर करारबद्ध होण्यापूर्वी खेळाडूचं नाव आयपीएलच्या खरेदीसाठी उपलब्ध खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करावं लागतं. या यादीत खेळाडूची पद्धतशीर नोंदणी करावी लागते. आणि ती करताना खेळाडूने आपली मूलभूत म्हणजे किमान किंमत नोदवायला लागते. या किमतीपेक्षा कमी पैसे बदली खेळाडूला देऊन चालत नाही. पण, मध्यावरच खेळाडूला करारबद्ध करण्यात आलं तर खेळाडूने न खेळलेल्या फ्रँचाईजीच्या सामन्यांचा विचार केला जातो. तेवढं शुल्क खेळाडूला कमी मिळतं.

फ्रँचाईजीच्या करारबद्ध खेळाडूंची संख्या २५ च्या वर जाऊ शकत नाही. त्यामुळे आधीच्या खेळाडूला ताफ्यात ठेवून तुम्ही बदली खेळाडू शक्यतो धेऊ शकत नाही. तसंच आधीच्या खेळाडूच्या किमतीपेक्षा बदली खेळाडूला दिला जाणारा मोबदला हा कमी हवा. आणि दुखापतग्रस्त खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे तो उर्वरित हंगाम खेळणार नाही, असं हमीपत्र फ्रँचाईजीने आयपीएलला द्यायला हवं. किंवा दुखापतग्रस्त खेळाडूला पुन्हा आयपीएल (IPL 2025) हंगामात परतता येणार नाही, असा नियमच आहे. त्यासाठी आयपीएलने प्रमाणित केलेल्या डॉक्टरकडून तसं पत्रही आणावं लागतं.

आतापर्यंत उमरान मलिकच्या दुखापतीमुळे कोलकाता संघाने चेतन सकारियाला (Chetan Sakariya) बदली खेळाडू म्हणून घेतलं आहे. दोघांची फी सारखीच आहे. तर मुंबई इंडियन्सनी (Mumbai Indians) मुजीब उर रहमानला (Mujeeb Ur Rahman) ताफ्यात घेतलं. त्याला अल्लाह गझनफारच्या (Allah Ghazanfar) जागी घेण्यात आलं आहे. गझनफारला ४.२ कोटी रुपये मिळणार होते. आता मुजीब उरला २.५ कोटी मिळणार आहेत. तर सनरायझर्स हैद्राबादने (SRH) ब्रायडन कार्सच्या जागी वियान मल्डरला ताफ्यात घेतलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.