-
ऋजुता लुकतुके
भारतीय ऑटो बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वाहनांची मक्तेदारी आता वाढत चालली आहे. बीवायडी या चिनी कंपनीचा भारतात प्रवेश झाला आहे. कंपनीने आपली सीलायन ७ (BYD Sealion 7) ही एसयुव्ही गाडी बाजारात आणली आहे. २५ मार्चपासून भारतात तिची विक्री सुरू होईल. ४५ ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या या गाडीची राजेशाही वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूया,
बीवायडी सीलायन (BYD Sealion 7) ही गाडी तब्बल ४,८३३ मिलीमीटर लांब आहे. आणि तिची रुंदी १,२९५ मिमींची आहे. तर उंची आहे १.६५ मिमींची. या मापावरूनच गाडीची भव्यता तुमच्या लक्षात आली असेल. गाडीचे एलईडी (LED) दिवेही रुंद आणि प्रशस्त आहेत. तर गाडीचं बॉनेट इतर गाड्यांच्या तुलनेत खाली आहे. गाडीतील डिकी ही ५८ लीटरची आहे.
(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये लिलावानंतरही खेळाडू बदलता येतात का? नियम काय सांगतो?)
आतून ही गाडी कुठल्याही लक्झरी गाडीशी स्पर्धा करू शकेल इतकी राजेशाही आहे. गाडीत चालकासमोर १२.५ इंचांचा डिस्प्ले आहे. तर १५.५ इंचांचा एक फिरता डिस्प्लेही आहे. गाडीत फास्ट चार्जिंगसाठी दोन टचपॅड उपलब्ध आहेत. या गाडीत ५०० लीटरची बूट स्पेसही मिळते.
BYD recently launched the Sealion 7 in India, which now joins the carmaker’s Atto3, Seal, and the eMax 7 EV range in the country. Let’s dive into its images.#byd #sealion7 #bydsealion7 #bydindia #cwphotos #cars #automobiles #carupdates pic.twitter.com/BIrhIui5N7
— CarWale (@CarWale) March 14, 2025
(हेही वाचा – Tata Sierra ICE : टाटा सिएरा आयसीईचं भारतात टेस्ट ड्रायव्हिंग सुरू, समोर आले काही अनोखे फिचर)
या गाडीत ८२.५६ किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. आणि हे इंजिन ५२३ बीएचपी (BHP) इतकी शक्ती निर्माण करु शकतं. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी ५२३ किमींचा पल्ला गाठू शकते. तर २४ मिनिटांमध्ये गाडी १० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. शून्य ते १०० किमींचा वेग ही गाडी फक्त ४.५ सेकंदांत गाठू शकते.
गाडीत तब्बल १२ स्पीकर असतील. तर चालकाच्या सुरक्षेसाठी यात अव्वल दर्जाची एडीएएस (ADAS) यंत्रणाही बसवण्यात आली आहे. चालकाने मार्गिका बदलल्यास तसंच दोन गाड्यांमधील अंतर अचानक कमी झाल्यास ही गाडी चालकाला तसं सूचित करेल. त्याचबरोबर रस्त्यांवर वाहनांसाठी दिलेल्या सूचनाही या गाडीला वाचता येतील. गाडी कुठे आहे याचं लाईव्ह लोकेशन अचूक दाखवणे, बाहेरच्या हवामानाचा अंदाज आणि नॅव्हिगेशन यातही गाडी चालकाला मदत करू शकते.
अशा या आधुनिक गाडीची किंमत ४८ लाखांपासून सुरू होते. बीवायडी सील (BYD seal), किया ईव्ही ६ (Kia EV 6), बीएमडब्ल्यू आयएक्स१ (BMW IX1) या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community