IPL 2025 : बंगळुरूच्या चाहत्यांवर अजूनही विराटची जादू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला नवीन संघ चिन्नास्वामी स्टेडिअमवर लोकांसमोर आणला.

33
IPL 2025 : बंगळुरूच्या चाहत्यांवर अजूनही विराटची जादू
IPL 2025 : बंगळुरूच्या चाहत्यांवर अजूनही विराटची जादू
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या (IPL 2025) नवीन हंगामापूर्वी आता प्रत्येक फ्रँचाईजीच्या प्रमोशनल कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर (M.Chinnaswamy Stadium) प्रेक्षकांच्या उपस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) नवीन जर्सी आणि किटच्या अनावरणाचा कार्यक्रम झाला. याला अनबॉक्सिंग इव्हेंट असं नाव देण्यात आलं होतं. खेळाडू मैदानावर जमले. आणि एकेका खेळाडूचं नाव जाहीर केलं जात असताना विराटचं (Virat Kohli) नाव समोर येताच प्रेक्षकांनी जल्लोष केला. विराट आणि नवीन कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) यांनी यावेळी व्यासपीठावरून चाहत्यांशी संवादही साधला.

सोहळा संपल्यानंतर विराट (Virat Kohli) आणि खेळाडूंनी मैदानाभोवती एक फेरी मारली. वातावरणात विराट, विराट असा गजर होत होता. आणि विराटनेही सोव्हेनिअर चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावून चाहत्यांना चांगला प्रतिसाद दिला. २००८ मध्ये आयपीएलच्या (IPL 2025) स्थापनेपासून विराट बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सबरोबर (RCB) आहे. आणि या काळात ८,००० पेक्षा जास्त धावा करत तो फ्रँचाईजीसाठी सगळ्यात यशस्वी खेळाडू ठरला आहे. तर आयपीएलच्या इतिहासातही सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर आहेत.

(हेही वाचा – Nagpur Violence: ११ ठिकाणी संचारबंदी कायम; १५० हून अधिक शाळा बंद)

‘माझ्या मागोमाग जो खेळाडू आता व्यासपीठावर येणार आहे, तो तुमच्या संघाचं नेतृत्व दीर्घ कालावधीसाठी करणार आहे. आणि तो दीर्घकाळ तुमच्याबरोबर असणार आहे. तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करा. तुमचं प्रेम त्याला द्या. तो चांगला नेता आहे. आणि त्याची कामगिरी आणि संघाप्रती कटीबद्धता तर तुम्ही वेळोवेळी पाहत आला आहात. त्याला तुमचा पाठिंबा हवा आहे,’ असं म्हणत विराटने रजत पाटिदारला (Rajat Patidar) व्यासपीठावर बोलावलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर २२ मार्चला होणार आहे. याच सामन्याने आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरुवात होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.