
मराठी चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच समृद्ध इतिहास आहे. खरं तर, पहिला भारतीय चित्रपट, राजा हरिश्चंद्र (१९१३) हा चित्रपट महाराष्ट्रातील दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केला होता. मराठी चित्रपट त्यांच्या उत्कृष्ट कथाकथनासाठी, सांस्कृतिक भावनेसाठी आणि दैनंदिन जीवनाचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
कुटुंब, परंपरा, सामाजिक समस्या आणि नातेसंबंध यासारख्या विषयांवर मराठी चित्रपट बेतलेले असतात. तसेच विनोदी, नाटक, प्रणय आणि थ्रिलर यासारखे चित्रपटही असतात. तुम्हाला जर मराठी चित्रपट OTT वर पाहायचे असतील तर आम्ही तुमच्यासोबत ती माहिती शेअर करत आहोत. (ott movies)
(हेही वाचा – ८ दिवसांच्या मोहिमेला लागले २८६ दिवस; Sunita Williams यांच्या परतीच्या प्रवासाचा खर्च किती ?)
१. सैराट (ZEE5 वर उपलब्ध)
नागराज मंजुळे दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा केवळ एक प्रेमकथा नाही तर ग्रामीण भारतातील जातीभेदावर भाष्य करतो. हा चित्रपट वेगवेगळ्या जातींमधील प्रेमी-युगुलांच्या सामाजिक दबावांशी झुंजतानाच्या प्रवासाचे वर्णन करतो. अजय-अतुल यांच्या हृदयस्पर्शी संगीतामुळे चित्रपट उंचीवर जातो.
२. नटसम्राट (प्राइम व्हिडिओवर उपलब्ध)
प्रख्यात नाना पाटेकर यांच्या अभिनयाची जादू असलेला हा चित्रपट एका मराठी नाटकाचे रूपांतर आहे. ही एका रंगमंचावरील वृद्ध अभिनेत्याची मार्मिक कथा आहे. अप्पासाहेब बेलवलकर निवृत्ती झाल्यानंतर आयुष्याशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करतात. मग त्यांच्या आयुष्यात काय संघर्ष येतो हे या चित्रपटात पाहू शकता!
३. वेड (हॉटस्टारवर उपलब्ध)
रितेश आणि जेनेलिया देशमुख अभिनीत हा रोमँटिक ड्रामा प्रेम, उत्कटता आणि आकांक्षांची कथा आहे. प्रेमात बुडाल्यावर मनावर कसा परिणाम होतो याचे हृदयस्पर्शी चित्रण आहे.
४. नाळ (ZEE5 वर उपलब्ध)
“नाळ” हा एक सुंदर चित्रपट आहे जो एका लहान मुलाच्या भावनांचा शोध घेतो. ग्रामीण पार्श्वभूमीवर बालपणीच्या निरागसतेचे उत्कृष्टपणे चित्रण करणारा हा चित्रपट नक्की बघा.
५. कट्यार काळजात घुसली (ZEE5 वर उपलब्ध)
हा चित्रपट म्हणजे एका प्रसिद्ध मराठी नाटकाचे सिनेमॅटिक रूपांतर आहे. हा चित्रपट भारतीय शास्त्रीय संगीत, कलात्मकतेच्या जगात डोकावतो. भावपूर्ण संगीतामुळे चित्रपट अविस्मरणीय ठरतो. (ott movies)
(हेही वाचा – IPL 2025 : बंगळुरूच्या चाहत्यांवर अजूनही विराटची जादू)
६. कोर्ट (नेटफ्लिक्सवर उपलब्ध)
हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट भारताच्या न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणारा कोर्टरूम ड्रामा आहे. स्वातंत्र्य आणि न्याय व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणारा ह्रदयस्पर्शी चित्रपट म्हणजेच कोर्ट…
७. हरिश्चंद्राची फॅक्टरी (अॅपल टीव्हीवर उपलब्ध)
ही आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची प्रेरणादायी कहाणी. भारतीय चित्रपट उद्योगाचा जन्म कसा झाला याचा हा एक आनंददायी पण विचार करायला लावणारा प्रवास आहे.
८. देऊळ (प्राइम व्हिडिओवर उपलब्ध)
“देऊळ” हा एक उत्तम विनोदी चित्रपट आहे जो धार्मिक भावनांचे व्यावसायिकीकरण कसे होते यावर प्रकाश टाकतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
९. झोंबिवली (ZEE5 वर उपलब्ध)
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन पाया घालणारा हा डोंबिवलीतील एक झोंबी कॉमेडी चित्रपट आहे. विनोद आणि रोमांच या मिश्रणाने हा चित्रपट फ्रेश अनुभव देतो.
१०. डबल सीट (प्राइम व्हिडिओ आणि ZEE5 वर उपलब्ध)
ही हृदयस्पर्शी कथा मुंबईत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याभोवती फिरते. शहरी जीवनाचे सार दाखवताना त्यांचे संघर्ष आणि स्वप्ने सुंदरपणे टिपले आहे. (ott movies)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community