कारवाईच्या भीतीने लाच घेणा-या महिला अधिकारी फरार

वैशाली यांच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

134

शिक्षण संस्थेकडून एका अधिकारी महिलेने लाच घेतल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे. लाचलुचपत विभागा(एसीबी)ने त्यांची चौकशी केल्यानंतर संभाव्य कारवाईच्या भीतीने महिला अधिकारी वैशाली वीर आता फरार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वैशाली यांच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

शिक्षण संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन सुरू करण्याचा आदेश देण्याच्या मोबदल्यात, शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी ९ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड करत ही रक्कम ८ लाख रुपये इतकी करण्यात आली.

(हेही वाचाः बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून महापालिका 40 लाख वसूल करणार का?)

एसीबीची कारवाई

याबाबतची तक्रार मिळताच नाशिकमधील एसीबी पथकाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला. त्यावेळी तिघा संशयितांना एसीबीने ताब्यात घेतले होते. संध्याकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली. यात वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यांना न्यायालयात हजर केल्यानंतर, त्यांना १३ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यात गैरहजर

वैशाली वीर या महिला असल्याने त्यांना सूर्यास्तानंतर अटक करता येत नव्हते. त्या लाचलुचपत विभागाने समन्स बजावत त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या जबाबदारीवर घरी सोडले होते. मात्र सकाळी ८ वाजता वीर यांना भद्रकाली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश असताना त्या गैरहजर राहिल्या. दुपारी अडीच पर्यंत वैशाली हजर न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार असल्याचा खुलासा न्यायालयात केला. ज्या नातेवाईकांनी वीर यांना पोलिस ठाण्यात हजर करण्याची हमी दिली होती, त्यांच्यावर कारवाई अपेक्षित असल्याचे, सरकारी वकील मिसर यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः वर्षा गायकवाड शिक्षण खात्यात ‘नापास’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.