औरंगजेबाची (Aurangzeb) कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात दि. १७ मार्च रोजी दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. धर्मांधांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर पुढील आदेशापर्यंत नागपूरात संचारबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (Rashtriya Swayamsevak Sangh) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यातच संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. (Nagpur violence)
( हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या सर्व कर्णधारांची २० मार्चला बैठक; नवीन नियमांची देणार माहिती)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rashtriya Swayamsevak Sangh) अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगळूरूमध्ये (Bangalore) होणार असून या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, औरंगजेबाचा मुद्दा हा सध्या संयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा शब्दात आंबेकर (Sunil Ambekar ) यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या औरंगजेबाच्या मुद्द्यासंदर्भात आणि हिंसाचाराबद्दल (Nagpur violence) संघाची भूमिका स्पष्ट केली आहे.
पुढे आंबेकर (Sunil Ambekar ) म्हणाले की, संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करत नाही अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांना देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना आता औरंगजेबाचा (Aurangzeb) प्रश्न समोर करून आंदोलन करणे योग्य आहे का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेरकर यांनी औरंगजेबाचा (Aurangzeb) मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, अशा शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली. (Nagpur violence)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community