माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करावा; भाजपा गटनेते Pravin Darekar यांची मागणी

35
माँ जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करावा; भाजपा गटनेते Pravin Darekar यांची मागणी
  • प्रतिनिधी

इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीस्थळाचा दर्जेदार विकास करावा, अशी ठाम मागणी भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. समाधीस्थळी आजही कुठल्याही दर्जेदार मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे रायगड प्राधिकरणाच्या कामाचा तातडीने आढावा घेऊन शासनाने मूल्यमापन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पाचाड येथील जिजाऊ समाधीस्थळाच्या विकासाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत भाग घेताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळावर कुठल्याही दर्जेदार सुविधा नाहीत. समाधीस्थळ हे आपल्या इतिहासाचे महत्त्वाचे पाऊलखुणा आहे. त्या जतन करणे काळाची गरज आहे.”

(हेही वाचा – विधान परिषदेच्या उपसभापती Dr. Neelam Gorhe यांच्यावर विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर)

६०० ते ६५० कोटी रुपये निधी रायगड प्राधिकरणाला देण्यात आला आहे, मात्र तो निधी फक्त नातेखिंडीपासून काँक्रिटचा रस्ता करण्यापुरता मर्यादित राहू नये. प्राधिकरणाच्या कामाचा, निधीच्या वापराचा, कामाच्या प्राधान्याचा आढावा घेऊन आवश्यकता असल्यास पर्यटन विभागाच्या माध्यमातूनही निधी द्यावा, अशी मागणी दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. दरेकर यांनी पुढे प्रश्न केला की, “प्राधिकरणाचा निधी कधी उपलब्ध करून दिला जाणार? पर्यटन विभागाकडून वाढीव निधी मिळणार का? सरकार यावर मूल्यमापन करणार का?”

या प्रश्नाला उत्तर देताना सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार म्हणाले, “रायगड प्राधिकरणाला निधी वळता केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये त्यात वाढही केली आहे. २०१७ पासून टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सूचविल्यानुसार कामांचा पाठपुरावा आणि मूल्यमापन करण्यासाठी लवकरच एक बैठक घेऊ.” त्यांनी स्पष्ट केले की, “पर्यटनासाठी वेगळा निधी मागण्याची गरज नाही, पण कामांचा दर्जा आणि प्राधान्य यावर आढावा घेऊन निर्णय घेऊ.”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.