Shashi Tharoor यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून केले कौतुक; कारण…

रायसीना डायलॉगमध्ये बोलताना शशी थरूर म्हणाले  (Shashi Tharoor) की, जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा मी भारताच्या भूमिकेवर टीका केली होती आणि हे आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.

67

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. थरूर हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकदा कॉँग्रेसच्या नेतृत्वाचे कान उपटले आहेत. आता त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

भारताच्या संतुलित मुत्सद्देगिरीमुळेच जागतिक स्तरावर आपल्या देशाचे महत्त्व वाढले आहे.रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारताच्या तटस्थ धोरणावर काँग्रेस खासदार शशी थरुर  (Shashi Tharoor) यांनी टीका केली होती. पण, आता थरुर यांची नवी प्रतिक्रिया आली आहे. भारताच्या धोरणाबाबत त्यांनी केलेली पूर्वीची टीका चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आणि आजच्या परिस्थितीत हे धोरण यशस्वी होताना दिसत असल्याचे म्हटले. ते  (Shashi Tharoor)म्हणाले, ‘मी अजूनही माझ्या चेहऱ्यावरील डाग पुसत आहे, कारण फेब्रुवारी 2022 मध्ये संसदीय चर्चेत मी एकमेव व्यक्ती होतो, ज्याने आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आधारे भारतीय भूमिकेवर टीका केली होती.’

(हेही वाचा Jammu and Kashmir: घुसखोरी प्रकरणी एनआयएची छापेमारी; राज्यातील 10 ठिकाणी एकाच वेळी केली कारवाई)

रायसीना डायलॉगमध्ये बोलताना शशी थरूर म्हणाले  (Shashi Tharoor) की, जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा मी भारताच्या भूमिकेवर टीका केली होती आणि हे आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. परंतु आता तीन वर्षांनंतर मला वाटते की, भारताच्या धोरणामुळे देश मजबूत राजनैतिक स्थितीत आला आहे. भारताच्या धोरणामुळे पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष, या दोघांनाही दोन आठवड्यांच्या कालावधीत भेटू शकले. ही परिस्थिती भारताला जागतिक शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी देते, जी जगातील फार कमी देशांना प्राप्त आहे, असे शशी थरूर  (Shashi Tharoor) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.