परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी पाश्चात्य देशांना सुनावले खडेबोल

42
परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी पाश्चात्य देशांना सुनावले खडेबोल
परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांनी पाश्चात्य देशांना सुनावले खडेबोल

दुसऱ्या महायुद्धानंतर दीर्घ काळापासून भारताला स्वत:चा प्रदेश दुसऱ्याने बेकायदा ताब्यात घेतल्याच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी दि. १९ मार्च रोजी सांगितले. कव्याप्त काश्मीरच्या (Kashmir) संदर्भाने त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी रायसीना डायलॉगमध्ये (Raisina Dialogue) पाश्चात्य देशांच्या दुटप्पी धोरणावर जोरदार प्रहार केला आहे. काश्मीर (Kashmir) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मुद्द्यांवर पाश्चात्य देशांच्या ढोंगीपणावर त्यांनी टीका केली.

( हेही वाचा : नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड Faheem Khan ; गडकरींविरोधात लढवली होती निवडणूक

ज्याप्रमाणे प्रत्येक देशात सरकारे त्यांच्या देशात सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात, तसेच जागतिक पातळीवरही घडले पाहिजे. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाश्चात्य देशांच्या, विशेषतः ग्लोबल साउथ (विकसनशील देश) संबंधित बाबींमध्ये, ढोंगी धोरणाचे उदाहरण देताना, भारतीय भूमीवर पाकिस्तानने केलेला हल्ला किंवा घुसखोरी पाश्चात्य देशांनी प्रादेशिक वादात कशी बदलली हे सांगितले. काश्मीरवरील पाकिस्तानच्या आक्रमकतेचे राजनैतिक वादातून रूपांतर करण्यात पाश्चात्य देशांच्या भूमिकेवर त्यांनी टिका केला.

जयशंकर म्हणाले की, भारताने एका हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांकडे (United Nations) दाद मागितली होती. मात्र, त्याचे रुपांतर वादात करण्यात आले आणि हल्लेखोर आणि पीडित व्यक्तीला समान दर्जा देण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, ब्रिटन आणि अमेरिका हे दोषी होते, असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले. तसेच परराष्ट्र मंत्री जयशंकर (S. Jaishankar) यांनी काश्मीर मुद्द्यावर पाश्चात्य देशांच्या भूमिकेवर आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रदीर्घ काळापासून परकीय शक्तीच्या बेकायदेशीर ताब्याखाली आहेत. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पाकिस्तानने (Pakistan) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि लडाखच्या (Ladakh) काही भागांवर हल्ला करून त्यांचा ताबा घेतला. त्याच वेळी, १९५० आणि १९६० च्या दशकात चीनने या भागावर कब्जा केला, याची आठवण करून दिली. (S. Jaishankar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.