‘जागतिक आनंद दिन’ (International Day of Happiness) हा अर्थातच आनंदी राहण्याचा दिवस आहे. आनंद मिळवणं हे एक मूलभूत मानवी ध्येय आहे. संयुक्त राष्ट्र महासभा हे ध्येय जाणून आहे. म्हणूनच ती सर्व लोकांच्या आनंदाला आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी, आर्थिक वाढीसाठी अधिक समावेशक, न्याय्य आणि संतुलित दृष्टिकोन अवलंबिण्याचं आवाहन करते.
सरकार आणि जागतिक संघटनांनी मानवी हक्कांचं समर्थन करून, तसंच शाश्वत विकास उद्दिष्टांसारख्या धोरणात्मक चौकटींमध्ये कल्याण आणि पर्यावरणीय परिमाणांचा समावेश करून आनंदाला दिवस साजरा केला पाहिजे. शांतता आणि सामाजिक सुव्यवस्था राखण्यात, तसंच कर, कायदेशीर संस्था आणि सार्वजनिक सेवांच्या वितरणात सरकारचा प्रभाव सरासरी आयुष्याच्या समाधानाशी संबंधित असतो. संयुक्त राष्ट्र हे प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तींना, तसंच प्रत्येक वर्ग, व्यवसाय आणि प्रत्येक देशातल्या सरकारला जागतिक आनंद दिनाच्या (International Day of Happiness) उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतात.
(हेही वाचा – RRB ALP Exam : तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हरमध्ये अडचणी; रेल्वे लोको पायलट भरती परीक्षा रद्द)
जागतिक आनंद दिनाची पार्श्वभूमी
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जगभरातल्या माणसांच्या आयुष्यात आनंद आणि कल्याणाची सार्वत्रिक उद्दिष्टे आणि आकांक्षा म्हणून प्रासंगिकता आणि सार्वजनिक धोरणांच्या उद्दिष्टांमध्ये त्यांची ओळख पटवण्याचे महत्त्व ओळखून १२ जुलै २०१२ सालच्या ठरावामध्ये २० मार्च हा जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) म्हणून घोषित केला होता. तसंच शाश्वत विकास, दारिद्र्य निर्मूलन, आनंद आणि सर्व लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक विकासासाठी अधिक समावेशक, समतापूर्ण आणि संतुलित दृष्टिकोनाची आवश्यकता देखील त्यांनी ओळखली आहे.
हा ठराव भूतान या देशाने सुरू केला होता. भूतान हा १९७० सालच्या दशकाच्या सुरुवातीपासून राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय आनंदाचे मूल्य ओळखणारा आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदाचे ध्येय प्रसिद्धपणे स्वीकारणारा देश होता. महासभेच्या छत्तीसाव्या सत्रादरम्यान “आनंद आणि कल्याण : नवीन आर्थिक प्रतिमान परिभाषित करणे” या विषयावर उच्चस्तरीय बैठकीचं आयोजनही त्यांनी केलं. (International Day of Happiness)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community