-
प्रतिनिधी
राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या तांडा, वाडी व वस्त्यांवरील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना बुधवारी राज्याच्या विधिमंडळाचे (Legislature) प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची अनोखी संधी मिळाली. इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील ५६ मुली आणि ४४ मुलांसह एकूण १०० विद्यार्थी यावेळी विधानभवनात (Legislature) पोहोचले. यावेळी त्यांनी विधानसभेतील चालू अधिवेशनाचे सत्र पाहिले आणि विधिमंडळातील कामकाजाची माहिती घेतली. विधिमंडळाचे प्रत्यक्ष कामकाज पाहताना विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंद दिसून येत होता.
(हेही वाचा – नागपूर दंगलीबाबत संघाची पहिली प्रतिक्रिया; Sunil Ambekar म्हणाले, औरंगजेबाचा मुद्दा…)
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री अतुल सावे म्हणाले, “आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा विकास करावा आणि देशाच्या प्रगतीसाठी सक्षम नागरिक म्हणून योगदान द्यावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
विधानभवन (Legislature) भेटीआधी विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयालाही भेट दिली. इतिहास, संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारी ही सफर विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरली. ही भेट विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक अनुभव देणारी ठरली, अशी प्रतिक्रिया शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विधिमंडळ परिसरात येण्याची आणि प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा भाग होण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community