Vidhan Bhavan Library: विधानभवनातील मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण; ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ मात्र अडगळीत

703

Vidhan Bhavan Library : राज्याचे आर्थिक अधिवेशन (Budget Session 2025) शेवटच्या टप्प्यात आले असून, विधानभवनातून विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे. यामध्ये विधानभवनातील गॅलरीमध्ये अनपेक्षित दृश्य पाहायला मिळाले आहे. विधान भवनातील विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांची दालने कोट्यवधी खर्च करून चकाचक केली जात असताना विधान भवनाची ग्रंथसंपदा (bibliography) मात्र उघड्यावर पडली आहे. दालनांच्या बाहेरचा भाग चकाचक करण्यात आला असताना ग्रंथालयातील (library) अनेक दुर्मिळ पुस्तकं अंधारात आहेत. (Vidhan Bhavan Library)

मिळालेल्या माहीतीनुसार, विधानभवनातील (Legislature) ग्रंथायलयात मागील १०० वर्षांहून अधिक काळ जतन करून ठेवण्यात आलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा (Parliament House Rare Book Collection) आहे. तसेच विधानभवनातील डागडुजीच्या कामांसाठी ५८५ कोटीची रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र दुर्मिळ ग्रंथसंपदा अंधारात धुळखात पडली आहे.  

विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनासाठी विधानमंडळ चकाचक करण्यात आलं. महायुतीच्या पहिल्या काळात असलेल्या दालनांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अधिवेशन काळात हे काम थांबवण्यात आले आहे. मात्र काही दालनांच सुशोभीकरण पूर्ण झालं. दालनांच्या बाहेर झगमगणारे दिवे, आलिशान खुर्च्या, उंची फर्निचर अशी फेररचना करण्यात आली. या दुरवस्थेत विधानभवनाचा अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष झालं.

(हेही वाचा – Sulbha Sanjay Khodke : महाराष्ट्राच्या विधिमंडळात खोडके दाम्पत्याचा नवा रेकॉर्ड)

ग्रंथालयाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या कपाटाच्या रकान्यात जुने वर्तमानपत्रांचे गठ्ठे धूळ खात पडल्याचं इथं स्पष्टपणे पाहायला मिळालं. शेकडो संर्दभग्रंथ सहाव्या मजल्यावरील उद्वाहनाजवळ एकमेकांवर रचून ठेवण्यात आले असून पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील या ग्रंथांच्या स्कॅनिंगचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.