Coal : भारताने कोळसा उत्पादनात ओलांडला १ अब्ज टनाचा टप्पा 

43
Coal : भारताने कोळसा उत्पादनात ओलांडला १ अब्ज टनाचा टप्पा 

भारताने कोळसा (Coal) उत्पादनात दमदार कामगिरी करत, ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या बद्दलची माहिती केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी शुक्रवारी (दि.२१) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून दिली आहे.

(हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये शार्दूल ठाकूर जखमी मोहसीन खान ऐवजी लखनौ सुपरजायंट्सच्या ताफ्यात दाखल)

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे की, “भारताने कोळसा (Coal) उत्पादनाचा एक अब्ज टनांचा टप्पा ओलांडला आहे! अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षम पद्धतींसह, आम्ही केवळ उत्पादन वाढवले नाही, तर शाश्वत आणि जबाबदार खाणकाम देखील सुनिश्चित केले आहे. ही कामगिरी आमच्या वाढत्या वीज मागणीला चालना देईल, आर्थिक विकासाला चालना देईल आणि प्रत्येक भारतीयाचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत जागतिक ऊर्जा नेता बनण्याच्या मार्गावर असल्याचे देखील रेड्डी यांनी म्हटले आहे.”


(हेही वाचा – Bombay High Court ने पोलिसांना फटकारले; म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांविषयीचा कारभार सुधारा’)

‘आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षेचा कणा म्हणून काम करणाऱ्या कोळसा (Coal) क्षेत्रातील समर्पित कर्मचाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि वचनबद्धतेमुळे हे शक्य झाले आहे’, असे देखील केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी म्हटले आहे.” या मोठ्या कामगिरीबद्दल, पंतप्रधान मोदींनी कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, “भारतासाठी अभिमानाचा क्षण! १ अब्ज टन कोळसा उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. जी ऊर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आणि स्वावलंबनाप्रती आमची वचनबद्धता अधोरेखित करते. हे यश या क्षेत्राशी संबंधित सर्वांचे समर्पण आणि कठोर परिश्रम देखील प्रतिबिंबित करते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.