दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानाला आग लागल्याच्या घटनेनंतर अग्नीशमन दलाला मोठं घबाड सापडलं. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींच्या होत असलेल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा-“संजय राऊतांनी मानसोपचार घ्यावेत, सरकार सर्व खर्च करेल” ; CM Devendra Fadnavis यांची टीका
न्यायाधीश यशवंत वर्मा यांची सर्वोच्च न्यायलयाच्या कॉलेजियमकडून शिफारस करण्यात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. बंगल्याला आग लागल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. (Supreme Court)
हेही वाचा- Bombay High Court ने पोलिसांना फटकारले; म्हणाले, ‘सायबर गुन्ह्यांविषयीचा कारभार सुधारा’
प्रकरणाबद्दल माहितीचा आढावा घेतल्यानंतर सीजेआ संजीव खन्ना यांनी कॉलेजियमची बैठक बोलवली, ज्यामध्ये एकमताने न्यायमूर्ती वर्मा यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, जेथे त्यांनी यापूर्वी ऑक्टोबर २०२१ पर्यंत काम केले आहे. (Supreme Court)
हेही वाचा- हिंमत असेल तर…, सभागृहात चित्रा वाघ आक्रमक | Chitra Wagh | Vidhan Sabha | Vidhan Parishad
कॉलेजियमच्या काही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली की फक्त न्यायमूर्ती वर्मा यांची बदली केल्याने न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन होईल आणि कायदेशीर व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होईल. तसेच त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांनी स्वेच्छेने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. जर त्यांनी नकार दिला तर संसदेत महाभियोगाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. (Supreme Court)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community