IPL 2025 : यंदा आयपीएलमध्ये एका डावांत ३०० च्या वर धावा होणार?

IPL 2025 : सनरायझर्स हैद्राबादच्या हनुमा विहारीने तशी घोषणाच केली आहे. 

33
IPL 2025 : यंदा आयपीएलमध्ये एका डावांत ३०० च्या वर धावा होणार?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलच्या आधीच्या हंगामात धावांचे अनेक विक्रम झाले आणि ते मोडितही निघाले. यावेळी एका डावांत ३०० पेक्षा जास्त धावा बघायला मिळतील असा विश्वास सनरायझर्स हैद्राबादचा मुख्य खेळाडू हनुमा विहारीने व्यक्त केला आहे. गेल्याच हंगामात सनरायझर्स हैद्राबादने बंगळुरूविरुद्ध २८७ धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम सांघिक धावसंख्या आहे. तेव्हाच एका डावांत ३०० धावांची चर्चा सुरू झाली होती. पण, गेल्या हंगामात ते घडू शकलं नाही. पण, यंदा मात्र अभिषेक वर्मा, ट्रेव्हिस हेड, ईशान किशन तसंच हेनरिक क्लासेन यांच्या समावेशामुळे संघ निश्चित ३०० च्या पार जाऊ शकतो, असं विहारीला वाटतं. (IPL 2025)

‘हैद्राबाद फ्रँचाईजीने आपल्या ताफ्यात काही चांगले फलंदाज घेतले आहेत. हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला येतील. त्यानंतर ईशान किशन संघात असू शकतो. तर तळाला येऊन क्लासेन आणि नितिश रेड्डीही घणाघाती फलंदाजी करू शकतात. हे पाहता, यंदा ३०० धावा नक्कीच होऊ शकतात,’ असं विहारी जिओस्टारवरील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला. (IPL 2025)

(हेही वाचा – सरसंघचालकांना उचलून मुंबईत आणा; Paramvir Singh यांनी दिलेला आदेश)

गेल्या हंगामात सनरायझर्स हैद्राबादचा संघ उपविजेता ठरला होता. यंदाचा संघही अंतिम फेरीपर्यंत मजल मारू शकतो. आणि पंजाब किंग्जचा संघही प्रबळ दावेदार आहे, असं मत विहारीने व्यक्त केलं आहे. ‘सनरायझर्स आणि पंजाब असे दोन संघ यंदा अंतिम फेरीत पोहोचतील, असं मला वाटतं. दोन्ही संघ चांगले आहेत. मुख्य म्हणजे त्यांचे प्रशिक्षक चांगले आहेत. आणि त्यांनी संघाला मोकळेपणाने खेळण्याची मुभा दिली आहे. पंजाबकडेही स्टॉईनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि इंग्लिस असे तगडे तीन फलंदाज आहेत. अशावेळी दोन्ही संघ मोठी धावसंख्या रचू शकतात. आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलागही करू शकतात,’ असं विहारीला वाटतं. (IPL 2025)

सनरायझर्सकडून नितिश कुमार रेड्डीवर विहारीच्या आशा आहेत. ऑस्ट्रेलियात स्वत:ला सिद्ध केल्यानंतर यंदाची आयपीएल त्याने गाजवली, तर पुढील दहा वर्षं तो भारताकडून खेळू शकेल, असं भाकीतच विहारीने व्यक्त केलं आहे. तर फिरकीमध्ये राहुल चहर आणि ॲडम झंपाकडून त्याला अपेक्षा आहेत. (IPL 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.