Spicejet in Jeopardy : स्पाईसजेट कंपनी पुन्हा आर्थिक संकटात; कायदेशीर लढायांमुळे परिस्थिती बिकट

Spicejet in Jeopardy : एका इंडोनेशियन कंपनीने स्पाईसजेटवर वसुलीसाठी दावा ठोकला आहे.

33
Spicejet in Jeopardy : स्पाईसजेट कंपनी पुन्हा आर्थिक संकटात; कायदेशीर लढायांमुळे परिस्थिती बिकट
  • ऋजुता लुकतुके

स्पाईसजेट ही देशातील एक विमान कंपनी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा फटका कंपनीला बसतो आहे. त्यातच इंडोनशियातील एका कंपनीने आता ५० लाख अमेरिकन डॉलरच्या एका थकबाकीसाठी कंपनीवर दावा ठोकला आहे. कंपनीची मालमत्ता विकून हे देणं फेडावं अशी इंडोनेशियन कंपनीची मागणी आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाने या प्रकरणी स्पाईसजेट कंपनीला २१ एप्रिलपर्यंतची मुदत दिली आहे. (Spicejet in Jeopardy)

इंडोनेशियातील पीटी बीबीएन या विमान कंपनीकडून स्पाईसजेटने जून २०२४ मध्ये ३ बोईंग विमानं भाड्याने घेतली होती. आणि तेव्हापासून कंपनीने ती वापरलीही. पण, त्यांचं भाडं आणि देखभालीचा खर्च कंपनीने अजून दिला नसल्याचा आरोप पीटी बीबीएनने केला आहे. बीबीटीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्पाईसजेटला पाठवलेल्या प्रत्येक ई-मेल आणि व्हॉट्सॲप संदेशाला कंपनीने उत्तर दिलं आहे. काही वेळा मागणीनुसार, एकूण देय रकमेच्या मानाने थोडी रक्कमही भरली. पण, नोव्हेंबर २०२४ पासून स्पाईसजेटकडून कुठलेही पैसे मिळालेले नाहीत, असा पीटी बीबीटीचा दावा आहे. (Spicejet in Jeopardy)

(हेही वाचा – वांद्रे पूर्वे येथे राज्याचे नवीन ‘महापुराभिलेख भवन’ बांधणार; मंत्री Adv Ashish Shelar यांची घोषणा)

तर स्पाईसजेटनेही आपली बाजू मांडताना विमानं आपल्याकडे उशिरा पोहोचल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागल्याचं म्हटलं आहे. शिवाय याविषयी कंपनीकडे लेखी तक्रार केलेली असताना प्राधिकरणाकडे दावा करताना मात्र कंपनीने तो मजकूर गाळल्याचा आरोप स्पाईसजेटने केला आहे. (Spicejet in Jeopardy)

पण, महत्त्वाचं म्हणजे स्पाईसजेट ही कंपनी कोव्हिड नंतरच्या काळात झालेलं नुकसान भरून काढून स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असताना संकटं मात्र वाढत चालली आहेत. कारण, मालमत्ता विकून देणं वसूल करण्यासाठी कंपनीविरोधात झालेला हा विसावा दावा आहे. विमानं भाड्याने देणाऱ्या एजन्सी, विमान कंपनीला सेवा पुरवणारे व्हेंडर आणि कंपनीकडे काम केलेले विमानवाहक अशा अनेकांनी दावे ठोकले आहेत. कंपनीचा माजी विमानचालक देवेश बयानने पूर्वीच कंपनीवर १.७० कोटी रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. स्पाईसजेटची अवस्था सध्या बिकट असून कंपनीची ३६ विमानं ही वापराविना पडून आहेत. तसंच भारतीय बाजारपेठेतील कंपनीची हिस्सेदारीही ७.३ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांवर आली आहे. (Spicejet in Jeopardy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.