Rupee Vs Dollar : भारतीय रुपयाची गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; आठवडाभरात १.२ टक्क्यांची वाढ

Rupee Vs Dollar : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आता ८६ रुपयांवर पोहोचला आहे.

41
Rupee Vs Dollar : भारतीय रुपयाची गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; आठवडाभरात १.२ टक्क्यांची वाढ
  • ऋजुता लुकतुके

भारतीय रुपयाने या आठवड्यात गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. खासकरून शुक्रवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८५.९७२ पर्यंत खाली आला होता. मग दिवस संपता संपता तो ८६ रुपयांवर स्थिरावला. पण, या आठवड्याचा अंदाज घेतला तर रुपयाची दोन वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी बघायला मिळाली आहे. आठवडाभरात रुपया १.२ टक्क्यांनी सुधारला आहे. (Rupee Vs Dollar)

९ जानेवारीला रुपया शेवटचा ८६ रुपयांच्या आत होता. त्यानंतर त्याने ८७ रुपयांचा नीच्चांकही गाठला. पण, आता तो थोडा सावरताना दिसत आहे. रिझर्व्ह बँकेनं यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकन डॉलर आणि रुपयांमधील स्वॅप व्यवहारांमुळे रुपया सावरायला मदत झाली आहे. तसंच वेळोवेळी आपल्याकडे डॉलर विकून मध्यवर्ती बँकेनं रुपयाचा तोल सावरला आहे. (Rupee Vs Dollar)

(हेही वाचा – IPL 2025 : कोलकाता वि. लखनौ सामना आता गुवाहाटीत)

‘रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी केलेला हस्तक्षेप, तसंच कच्च्या तेलाच्या किमतीतील स्थिरता, परकीय कर्जाचा हलका झालेला भार आणि देशांतर्गत महागाई कमी झाल्याचा परिणाम रुपया मजबूत होण्यात झाला आहे. मार्चच्या सुरुवातीपासून रुपयांत मजबुती यायला सुरुवात झाली आणि ती आगामी काळातही टिकेल,’ असा विश्वास बँक ऑफ बडोद्याच्या अर्थतज्ज्ञ अदिती गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. (Rupee Vs Dollar)

फेब्रुवारी महिन्यात भारताची व्यापारी तूटही भरून निघाली आहे. किंबहुना भारताने या महिन्यात ४.०५ अब्जांची अधिशेष नोंदवला आहे. म्हणजे भारतीय निर्यात ही आयातीपेक्षा ४ अब्ज अमेरिकन डॉलरनी जास्त होती. यावर्षी जानेवारी महिन्यात भारताची वित्तीय तूट २३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात होती. त्या मानाने ही मोठी मजल भारताने मारली आहे. त्याचाही परिणाम रुपयावर झाला आहे. (Rupee Vs Dollar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.