Boxing in Olympics : लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धाची वापसी; ऑलिम्पिक समितीची मान्यता

Boxing in Olympics : सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.

36
Boxing in Olympics : लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धाची वापसी; ऑलिम्पिक समितीची मान्यता
  • ऋजुता लुकतुके

२०२८ साली होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्ध खेळाचा पुन्हा एकदा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयाला अखेर मान्यता दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे समितीच्या बैठकीत सर्वच्या सर्व सदस्यांनी मुष्टियुद्धाच्या समावेशाच्या बाजूने कौल दिला. मावळते अध्यक्ष थॉमस बाख यांनी आपल्या नेतृत्वाखाली घेतलेला हा अखेरचा निर्णय ठरणार आहे. १९०४ ला ऑलिम्पिक चळवळ सुरू झाल्यानंतर फक्त एकदा १९१२ साली स्वीडनने मुष्टियुद्धाचा समावेश ऑलिम्पिक खेळांमध्ये केला नव्हता. त्यानंतर हा खेळ प्रत्येक ऑलिम्पिकचा भाग राहिला आहे. (Boxing in Olympics)

(हेही वाचा – वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमीनी काढून घेणार; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची घोषणा)

आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध असोसिएशनवर रशियाचा पगडा आहे आणि ही असोसिएशन आणि ऑलिम्पिक समिती यांच्यामध्ये आर्थिक कारणांवरून वाद होते. त्यामुळे हा खेळ ऑलिम्पिक चळवळीतून बाहेर पडेल अशी भीती गेली काही वर्षं व्यक्त होत होती. २०२० चं टोकयो ऑलिम्पिक आणि २०२४ चं पॅरिस ऑलिम्पिक या दोन्ही स्पर्धांमध्ये मुष्टियुद्धाचं आयोजन हे ऑलिम्पिक समितीकडून केलं गेलं. त्यानंतर मात्र मावळते अध्यक्ष थॉमस बाख यांनी या खेळाची एक ठोस आंतरराष्ट्रीय संघटना असावी अशी भूमिका घेतली होती. (Boxing in Olympics)

(हेही वाचा – Coal : भारताने कोळसा उत्पादनात ओलांडला १ अब्ज टनाचा टप्पा )

सर्व देशांच्या राष्ट्रीय संघटनांचं नेतृत्व करणारी, विश्वसनीय संघटना मुष्टियुद्ध या खेळासाठी हवी, बाख यांनी यापूर्वी म्हटलं होतं. आणि तशी संघटना नसेल तर २०२८ च्या ऑलिम्पिकमधून मुष्टियुद्धाला बाहेर करण्यात येईल, असं सुतोवाचही त्यांनी केलं होतं. त्याप्रमाणे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसमोर आणण्यात आला आणि आता मतदान होऊन मुष्टियुद्धाच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. आंतरराष्ट्रीय संघटना उभारण्यावर देशांचा परस्पर सहमतीने विचार सुरू आहे. ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आता पदावरून निवृत्त झाले आहेत. आणि त्यांच्या जागी झिंबाब्वेच्या कर्स्टी कॉव्हेंट्री नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यापूर्वी बाख यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. (Boxing in Olympics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.