MMRDA कडून ताब्यात आलेले रस्ते आणि पूलांवर कोटींच्या खर्चाची उड्डाणे

216
MMRDA कडून ताब्यात आलेले रस्ते आणि पूलांवर कोटींच्या खर्चाची उड्डाणे
MMRDA कडून ताब्यात आलेले रस्ते आणि पूलांवर कोटींच्या खर्चाची उड्डाणे
  • मुंबई सचिन धानजी

एमएमआरडीएच्या (MMRDA) ताब्यात असलेले रस्ते आणि पुल महापालिकेने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर यावरच आता कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. पश्चिम द्रुतगती आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील खड्डे तसेच रस्त्याची सुधारणासह इतर कामांसाठी आजवर ३०० कोटींहून अधिक निधी खर्च केला असून अंधेरी पूलाच्या डागडुजीवरही १०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र,आता सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड (SCLR) आणि कुर्ला (Kurla) येथील स्वामी नारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्तीवरच तब्बल २८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध उड्डाणपूल, नाल्यांवरील पूल, वाहनांकरता असलेले भुयारी मार्ग, स्कायवॉक आदी एमएमआरडीएकडून (MMRDA) महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहे. यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील कुर्ला (Kurla) येथील स्वामी नारायण पुलाचीही डागडुजी करणे आवश्यक असल्याने याची तपासणी आयआयटी मुंबई यांच्या मार्फत करण्यात आली. आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार मुंबई महापालिकेने (BMC) पूर्व द्रुतगती महामार्गावरील स्वामी नारायण उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबरोबरच सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील (SCLR) पुलांचीही डागडुजी करण्याची मागणी झाल्याने महापालिकेने स्टक्टॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअरींग या सल्लागारामार्फत याचा सर्वे केला.

(हेही वाचा – Rupee Vs Dollar : भारतीय रुपयाची गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; आठवडाभरात १.२ टक्क्यांची वाढ)

त्यानुसार, महापालिकेने सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील (SCLR) पुल अणि कुर्ला स्वामी नारायण उड्डाणपूल आदींच्या दुरुस्तीसाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी फ्रेसिनेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील अंधेरी उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिल्यानंतर आता एससीएलआर आणि कुर्ला (Kurla) येथील स्वामी नारायण उड्डाणपुलाच्या डागडुजीवर तब्बल २५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

यापूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व उड्डाणपूल, भुयारी आदींच्या डागडुजीसाठी तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवून मुंबईकरांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी प्रवेश नियंत्रण प्रकल्प अर्थात एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट प्रकल्पांतंर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधील फडके फ्लायओवर, पार्ले हनुमान रोड जंक्शन, मिलन सब वे जंक्शन तसचे पूर्व उपनगरांतील बी के सी कनेक्शन आदी चार ठिकाणची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी विविध करांसह ११२५ कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा – लाडक्या बहिणींना २१०० रूपये कधी मिळणार ? Eknath Shinde यांनी सांगितलं …)

अशाप्रकारे करण्यात आलेला आहे खर्च

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवेश नियंत्रण प्रकल्प

  • प्रकल्प खर्च : ११२५.८८ कोटी रुपये
  • कंत्राटदार : आर पी एस इन्फ्राप्रोजेक्ट

पूर्व द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी

  • एकूण खर्च : ९३ कोटी रुपये
  • कंपनी : के आर कंस्ट्रक्शन

पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे व दुरुस्ती

  • एकूण खर्च : सुमारे ८५ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनी : प्रीती कंस्ट्रक्शन कंपनी

पूर्व द्रुतगती मार्गाची मास्टिकने सुधारणा

  • एकूण खर्च : सुमारे १८ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनी : शहा आणि पारीख

पूर्व द्रुतगती मार्गाची मायक्रो सरफेसिंगने सुधारणा

  • एकूण खर्च : ४६.३१ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनी : मारकोलाईन्स पेवमेंट टेक्नॉलॉजिस

पश्चिम द्रुतगती महामार्गाची पावसाळ्यापूर्वीची डागडुजी

  • एकूण खर्च : सुमारे १३१ कोटी रुपये
  • कंत्राट कंपनी : के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड – कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदार

पावसाळ्यापूर्वी पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांचे मास्टिकमध्ये खड्डे बुजवणे

  • एकूण खर्च : सुमारे ९० कोटी रुपये
  • कंत्राट कंपनी : कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.